पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक पत्र साठीला

एक पत्र साठीला

प्रिया,
मनःपूर्वक अभिनंदन,
परवा तू वयाचे साठ वर्ष पूर्ण करणार, म्हणून पत्र लिहण्याची उठाठेव. एरवी तुझी मत लक्षात आहेत, त्यात काय मोठसं एकोणसाठ वर्षे पूर्ण झाली, तसं हे साठव बस इतकंच.
इतकंच नसतं ग बाई खूप काही महत्वाच असतं. म्हणजे बघहं आपल्या जवाबदाÚया, आपली कर्तव्य पारं पडलेली असतात. नौकरीची दगदग, धावपळ संपलेली असते म्हणून हा दिवस दशा आणि दिशा दोन्हीचा विचार करायला लावणारा असतो.
साठीच्या मैलाच्या दगडावर बसून मागे वळून पाहण्याचा मोह भल्या-भल्याना आवरतं नाही, किंवा हा दिवस निवांत पणे स्वतः कडे पाहण्याचा असतो म्हणायला हरकत नाही.
आपण तुडवून आलेली लांबचलांब वाट दिसते, त्या वाटचालीतला, मैलाचा प्रत्येक दगड आठवण सांगतो. ते ओलांडलेले खाच खळगे दिसतात, ते खड्डे दिसतात ज्यात धडपडून खरचटलेलं आठवतं, ठोकर लागून जीव कासाविस झालेला आणि आजुबाजूच्या काट्यांनी कधी तरी रक्तबंबाळ केलेलं, दादाचं रागवणं बेंधणी कुठची!
कुठे गेलं ते वेंधळेपण? हरवलं, कोणीतरी हातात गुलाबाचं फूल घेउन उभं होतं वाटेत, त्या क्षणी वाटलं इतकं वाईट नसत आयुष्य, गुलाबपाण्याचा शिडकावं करणारं ही कोणी आहे या कल्पनेनं मन मोहरून जातं. गुलाबाचं फूल घेउन उभा असणारा तो आपण एकटे नाही, जीवनात संकट आली तर त्यावर मात करून पुढे नेणारा जोड़ीदार सोबत आहे ही जाणीव करून देतो. सहजीवन म्हणजे फुलांच्या पायघड्या अंथरून ठेवलेलं जग नाही हे ही कळतं. आशानिराशेन भरलेल, उलथा-पालथीन गजबजलेलं असतं आणि असावं, नुसतंच गोड़-गोड़ कसं असेल! थोडे संघर्ष, थोडे रूसवा फूगवी हे आंबट गोड़ अनुभव सुद्धा मैलाचे एक एक दगड असतात.
प्रसववेदनांनी बेजार झाल्यावर, बाळाचाट्यांहा ऐकून अंगावर फुलून येणारा आनंदाचा काटा आठवतोय! आयुष्य सार्थक झाल्याचा तो क्षण आणि मातृत्व पेलण्यासाठी करावी लागणारी धडपड. सगळं कसं सिनेमा सारखं डोळ्यापुढून सरकतं.
भाग्यवान आहेस मुलं हुषार, समंजस निघाली. चांगली शिकुन, मोठ्या हुद्यावर पोहचली. मुलांना तिथ पर्यंत पोहचवण्यात झालेली यातायात, नौकरी करून सांभाळता येणा-या हजार अडचणी सगळं सगळं विसरायला झालं. जेव्हा दोघांनी पहिल्या पगाराच जाडजूड पाकिट हातात ठेवली.
आजचा दिवस नुसताच आठवणींचा नसतो तर आत्ता पर्यंत देहभान विसरून सर्वांकरता धावपळ केली आता स्वतः करता काय करायचय! हे ठरवण्याचा असतो. आपली आवड, आपले छंद कसे जोपासयचे हा विचार करण्याचा असतो. विसरली! काढ शोधून टेबलटेनिसची बॅट, काॅलेज पर्यंत छान खेळत होती.
शोध ती वही त्यात काही तुझ्या आणि काही तू जमवलेल्या सुंदर कवितांची कात्रणं आहेत. आता स्वतः करता जगायचं कितीतरी मागे राहिलेल्या आवडी-निवडी पूर्ण करायच्या. आणि स्वतः करता जगता जगताचं संसाराच गुरफटलेल्या पसाÚयातूनं हळुहळु दूर जायच, मोकळं व्हायचं पलिकडे पण एक सुंदर जग आपली वाट पाहतय. बस एवढ भान ठेवलस की जिंकली तू संगळं काही.
तुझी जिवाभावाची मैत्रिण
डाॅ. संध्या भराड़े


(सुर-संध्या)
294, अनूपनगर
इन्दौर म.प्र. 452008
9300330133

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू