पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कथा कोविद 19

कथा कोविद-19


तुला आई होती का रे?
कोविद-19 हा फक्त कथेचा विषय राहिलाय का! तरं नाही, या विषयावर काव्य, खण्डकाव्य, महाकाव्य लिहलं जाईलं इतकचं नाही तर कथा, लेख, कादंबरया असे लेखनाचे सगळे प्रकार हताळले जातील. इतकं साहित्य निर्माण होईल की पुढच्या अनेक पिढ्या या वाचनावर मोठ्या होतील. आजी कोरोना ची गोष्ट सांगेल. आजोबांच्या बोलण्यात अमच्या वेळेस कसा कोरोना पसरला होता आणि आम्ही केस त्याचे खंदेवीर होतो, हे सांगण्यात येईल.
सध्या तरं या विश्वव्यापी महामारीतं, इतर सगळे विषय संपवून टाकलेय. कारण जळी, स्थथ्ी, पाताळी एकच विषय उरलाय कोविद-19. इतरं नैसर्गिक संकट विशिष्ट भागात येतं. सुनामी, चक्रीवादळ, अतिवृष्टि, अनावृष्टि वगैरे. युद्ध सुद्धा दोन देशात होतातं. त्या देशांना झेळ लागते पण कोरोनानं तरं जगभर थैमान मांडलय म्हणून लेखक, कविचं काय घेउन बसलाय, ज्यांनी हिशेबा शिवाय कधी हातात लेखणी धरली नाही ते सुद्धा आम्ही पाहिलेली महामारी कोरोना वर लिहायला पुढे सरसावतिल.
उदाहरणं द्यायच झालं तरं, पावसाला आला की प्रा. राम शेवाळकर म्हणायचे ‘तरूण भारत’ दैनिकाच्या कचेरी समोर एक पोतं ठेवायला हवं. त्यात पावसा सारख्या भसाभसा पावसाळी कविता येउन पडतिल. अगदी हिच स्थिती फाळणी (भारत-पाकिस्तान) च्या वेळेस होती. फाळणी होउन चांगले चाळिस वर्ष झाले होते हिंदी लेखक द्रोणवीर कोहली, फाळणीवर लिहलेल्या कादंबरीच बाड घेडन डॉ. प्रभाकर माचवें कडे गेले, तुम्ही वाचून पहा आणि सांगा मग मी छापयला देईन. काकांनी चार पानं चाळली अन म्हणाले ‘तुम्ही लोकं अजून किती वर्ष या विषयाला कॅश कराल! अरे आता चाउन चोथा झाला की हा विषय.’ एकादीच अमृता प्रितम असते रे जिची लहानशी कविता त्या वेळेस कैदेत असलेले आणि बाहेर असलेले तरूण खिशात घेउन फिरायचे कविता आहे -
अज्ज आंखर वारिस शाह तूं
कबरां विच बोल ते
अज्ज किताबे इश्कदां
अगला वरका खोल
ही कविता अमृताप्रितमनं वारिस शाह ला उद्देश्यून लिहली होती. पंजाबी भाषेचा पहिला कवि त्यानं हीर रांझा लिंहलय. कवियत्री म्हणते पंजाबची एक हीर रडली तर तू हीर रांझा काव्य रचलं आज लाखो हिर रडतात आहे. त्यांच्यावर कोण लिहिल?
युद्धाचं सुद्धातेच, युद्धाच्या वेळेस सैनिकांचे गोडवे गाणारया कविता, कथा खूप लिहल्या जातात युद्ध संपल की थोडे दिवस चघळलं ही जातं नंतर आपआपल्या उद्योगाला लागतात पण पोवाडे वर्षानुवर्ष गायले जातात. कथे करता तर सुभाषित आहे ‘युद्धस्य कथा रम्या’.
आमचं 5 मार्च चं तिकिट बुक होतं इन्दौर मुम्बई, मुम्बई कोल्हापुर, मुम्बई कोल्हापुर छोटसं विमान फार गम्मत वाटली. प्रवासात एरवी कतार एयरवेज, एमीरेटचे जंगी विमानांन प्रवास जरा दडपण येतं. तास भरात कोल्हापुरला पोहचलो.
महालक्ष्मीच्या देवळात छान गर्दीत रांगेत उभं राहून दर्शन घेतलं. महिला पोलिसची पण शाळा घेतली ‘ओरडले कशाला! देवळात कोणी राहायला येत नाही, दर्शन घेउन सगळे जाणारचं निट सांगत जा पुढे जा म्हणून’. सहज अम्बाबाई कडे लक्ष गेलं तर ती गालातल्या गालात हसतं होती. म्हणायचं असेलं बरं केले हवंच होतं कोणी तिला समज द्यायला.
शिवनेरीन पुणं गाठलं, तो पर्यंत कोरोना विदेशवासी आहे या भ्रमान चार दिवस मस्त भेटी-गाठी दगडुशेठ गणपतीची भेट. अस सगळ चालू होत पत्ते खेळणं भाच्चा आणि सुन छान फिरवतं होते पुणे दर्शन बरयाच वर्षानं गेलेलो, म्हणून बातम्याकडे पण लक्ष गेलं नाही.
12 मार्च ला जेंव्हा पुण इन्दौर गाडीत पाय ठेवला अन जाणवलं, अरेच्या कोरोना आपल्या देशात पोहचला वाटतं? कारण दोन महिने अगोदर सुद्धा ज्या गाडीचं रिझर्वेशन मिळायला मारामार त्या गाडीतच्या ए.सी बोगित फक्त 15 ते 20 माणसं! ती पण तोंडाला रूमाल बांधून? गंभीर वातावरण तेंव्हां समजलं कोरोना विदेशी राहिला नसून भारतात पण गोंधळ घालतोय. इंदौर ला पोहचल्यावर कोरोनाचे एक-एक गुण उधळणं दिसु लागलं म्हणजे इतिहास कहला. चीन नं वुहान मधे हा वायरस तैयार केलाय. प्रश्न पडतो माणूस इतका विध्नसंतोषी असू शकतो! की त्याला किती जास्त माणसं मरतिल याचा आनंद होण्या करता वायरस तैयार करावा! असतात बुआ सर्व तरेहची माणसं. म्हणतात नं! व्यक्ति तितक्या प्रकृति.
मूळ भारतीय पण सध्या अमेरिकेत असणारया माणसानं व्हाट्स ऐप वर मैसेज पाठवला की भारताच्या बातम्या म्हणजे आम्ही काय, काय करून खातोच, कसे लोकांना मदत करतोय, अमच्या इथे लोकं किती देणगी देतात आहे पण अर्थ व्यवस्थेचा कुठे विचारच नाही, तो आधी करायला हवां, म्हटलं बाबारे तुमच्या इथे मरणारयांची संख्या 75 हजार झाली आहे. ती एक लाख होणार नाही याची काळजी घे, उगीच उंटावरून शेळ्या हाकु नको आम्ही बघू आमच.
इतिहास नंतर भूगोल कळायला लागला कोविद-19 च्या उपद्रवाचा, सर्वात पहिला नंबर अमेरिका, इटली, फ्रांस, स्पेन एकानंतर एक देश भरडले जाउ लागले अर्थात भारत पण त्यात आलाय. आणि लॉक डाउन मधे नुसता इतिहास, भूगोल नाही तर समाजशास्त्र, राजनीतिशास्त्र, अर्थशास्त्र अगदी एम.ए. पर्यंत न शिकलेले सगळे विषय कळले. इतकंच नाही तर रोज ज्ञानात नवनवीन भर पडते आहे आणि तो भार पेलवतं नाही आता दैनिक वाचवेना, बातम्या ऐकवेना कारण क्रिकेट चा स्कोर सारखे, माणसाच्या मरणाचे आकडे, ऐकण्या इतकं मनं बधिर झालं नाही. नुसते व्हाट्स ऐप चे मैसेज गोळा केले तर मोट्ठी कादंबरी होईल. एकीकडे दानवीर लोकांची यादी म्हणजे टाटा पासून तर गोर गरिबांना अन्न धान्य पुरवणारे, पोळी भाजी देउन भूकेल्यांची भूक शमवणारे तरं दूसरी कडे लॉकडाउन चे नियम तोडण्याचे विक्रम करणारे, दारू करता जीव गहाण ठेवणारे आणि कसं ही करून घरी पोहचायचं म्हणून बायका, मुलां सह मैलोन मेल चालतं निघालेले मजूर. सगळंच अकल्पित, भांबाउन टाकणरं.
हैजा, डेंगू, चिकनगुनिया ही आजारपणं पाहीलेली पण या कोरोनाचा स्वभाव काही कळेना, म्हणजे भल्या भल्या वैज्ञानिकांना सुद्धा तो निटसा कळलेला नाही, कधी म्णतात सर्दी, खोकला, ताप आला तर कोरोना आहे समजायचं कधी म्हणतात असे काही लक्षणं नसले तरी पाॅझिटिव्ह केसेस येतात आहे, घरी राहा, साबणानं सारखे हाथ धुवा हे सगळं करून आमच्या शेजारयाची टेस्ट पाझिटिव्ह निघाली त्याचं काय!
पण 20 दिवसाच्या बाळाला कोरोना झाला अन त्याच्या आईला कळलं तू काय आहेस कसा आहेस इतकचं नाही तर तिनं तुला ही तुझी जागा दाखवून दिली. म्हणजे झालं काय तरं बाळाची टेस्ट पॉजिटिव आली म्हणून त्याला एडमिट करणं आलचं बरोबर आई पण एडमिट झाल्यातच जमा.
सुदैवानं बाळ बरं झालं आणि आज हाॅस्पिटल मधून घरी जायचा दिवस तरं तू आई जवळं जायला पाहत होता पण आईच ती, तुला छान खडसवलं - खबरदार पुढे आला तरं. थांब तिथेच.
कोरोना - ते शक्य नाही. मी येणारच तुझ्या जवळ.
आई - थांब म्हणते न! अवलक्षणी मेला.
कोरोना - तू काही म्हण.
आई - तुला आई नव्हती कां रे? अरे हो नव्हतीच तुला तरं बाप्यांनी बनवलय न! माणसं मिलायचा नर भक्षक राक्षस तैयार केलाय त्यांनी. आई असती तर असा बेफाम, बेशिस्त वागला नसता. तिने तुला छान वळण लावले असतं.
कोरोना - पण तुझं बाळ बरं झालय न आता!
आई - म्हणून काय झालं? आता त्याला माझी जास्त गरज आहे त्याला जपावं लागेल, त्याची औषधं दूधाच्या वेळा साभाळाव्या लागतिल.
आई - तुला कशाला सांगत बसले, हे सगळं कळायला आई नाही तर निदान माणूस तरी व्हायला हवं, तू तरं माणसं गिळायचं मशीन आहेस. चल दूर हो मला बाळाला घेउन घरी जायचय. घरी सगळे आमची वाट पाहतात आहे.

डॉ. संध्या भराड़े
(सुर संध्या)
294, अनूप नगर
इन्दौर म.प्र. 452008
9300330133

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू