पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भारत भूमी

भारत भूमी 


अभिमान वाटतो आपल्या संस्कृतीचा 

आजही जपत आहे अनोखी परंपरा 

साऱ्या विश्वात डंका वाजतो आपल्याच नवलाईचा

संकटकाळी मिळे आपल्या पुराणकथेचाच सर्वांना सहारा


रात्रंदिवस जवान करतात भारत भूमीचे रक्षण

आपल्यासाठी ते लावतात त्यांच्या जीवाची बाजी अनेकदामध्ये एकता हेच आपल्या प्रगतीचे लक्षण 

इथला प्रत्येकजण आहे देश रक्षण करण्यासाठी राजी


विविधतेने नटली आहे आपली भारतभूमी 

भारतभूमीच पालनपोषन करते सर्वांचे 

प्रत्येकालाच प्रिय आहे हि कर्मभूमी 

शब्द अपुरे पडती लिहता - लिहीता आपुल्या देशाचे..


: संग्राम संतोष सलगर 



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू