पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी कविता

शिर्षक :- माझी कविता✍🏼☺

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

उद्या कदाचित जगात मागे राहीलो नाही जरी मी

हसत,खेळत बागडत मागे राहिल माझी कविता


आज मला कोणी ओळखत नाही काहीच दुःख नाही

भरलेल्या या संसारात नाव काढेल माझी कविता


काय झाले जगासोबत आज राहिलो नाही जरी मी

प्रत्येकाच्या मनामनात उद्या राहिल माझी कविता


कवितेने मला नेहमीच भरभरून दान दिधले

मरनानंतरही श्वास बनून राहिल माझी कविता


काय झाले तुमच्या मनात आज राहिलो नाही जरी मी

प्रेमाचा सागर बनून मनामनात वाहिल माझी कविता


समजून घ्यावे तुम्ही रसिकांनी माझ्या या कवितेला

नाजू,साजूक,हळवी थोडी आहे माझी कविता


वाटलेच कधी मज घ्यावे अलविदा आता त्याची फिकीर नाही

कवितेने खुप दिलेय मजला आता काहीच जिकीर नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वलेखन :- प्रेमकवी सागर डवरी

विरार ,मुंबई


  1. दुरध्वनी :- 9082766848 ,9773325548


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू