पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सावित्रीची गं पुण्याई

सावित्रीची गं पुण्याई 


सावित्रीची गं पुण्याई 
मला शाळेत नेलं बाई ॥धृृ॥ 

नव्हता कोणताच अधिकार 
त्रास जीवाला होई फार 
विद्या शिकाईले नाही 
स्त्री घरात राबत  राही 
तिनं निश्चय केला ठायी 
मला शाळेत नेलं बाई ॥ 1॥


शेणामातीचा मार जरी 
साऊ त्रास सहन करी 
शिक्षणाचा घेतला वसा 
शेटजी वरी सारा भरवसा 
शिव्या शापाला सामोरी जाई 
मला  शाळेत नेलं बाई ॥ 2॥


दिनदुबळ्याचा केला संभाळ 
नाऊ माखू हो घातले  बाळ 
रुग्णांची केली हो सेवा 
दिला विद्येचा अनमोल ठेवा
नतमस्तक तिच्या पायी 
मला शाळेत नेलं बाई ॥3॥

कवी प्रदीप कासुर्डे नवी मुंबई 

 

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू