पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आमचा बाबा

 

बाबा
मानवतेचे महान मंदिर
नाव तयाचे आनंदवन
वेदनेच्या जाणिवेने
सदैव येथे भरते मन ॥1॥

तूच तयाचा शिल्पकार
जखमांना ही हास्य दिले
धुडकावलेल्या असंख्य जीवा
माणसांचा गाव मिळे ॥2॥

हात असूनी बोटे नाही
मुठीचा तू धीर दिला
अंध अपंग उपेक्षित
सुरू झाला सिलसिला ॥3॥

दया नको अश्रू नको
हवे नवनिर्माणाचे हात
तुम्हीच तुमचे साथी
एकमेकां देवू साथ ॥4॥

सेवाचा हा वसा घेऊनी
तुझेच आम्ही फिरतो दूत
जनसेवेचे व्रत आमचे
बाबांचे आम्ही मानसपूत ॥5॥

निराश होता अनेक वेळा
संकटांचा काळोख नभा
पाठीवरती हात ठेवूनी
तूच होतो आमचा बाबा ॥6॥

कवी प्रदीप कासुर्डे नवी मुंबई 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू