पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

क्षण

 

क्षण

क्षण क्षण ; माझे जीवन सरते; जीवन सरते!
क्षणा क्षणाने; मम मन मोहरुन जाते!
आनंदाच्या ; एक क्षणाने; जीवन फुलते!
क्षणा क्षणाने;माझे मी पण; खुलते!
क्षण प्रेमाचे; अल्प ही ; जीवनभर पुरते!
क्षण मैत्रीचे; आपुलकीचे;मी मनी जपते!
क्षणा क्षणाच्या;सार्थक्याने; मी बहरते!
क्षण मिलनाने; जिव शिवाच्या; एकरुप होते!
एकत्त्वातुन ; अनेक बनुनी; कौतुक बघते!
क्षणा क्षणाते; जागृत राहून; जग जिंकुनी जाते!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू