पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कोरोणा संकट आणि जगणं

कोरोणा संकट आणि वागणं

 

भारतात पहिला रुग्ण 30 जानेवारी ला समोर आला, 25 मार्च पर्यंत 659 रुग्ण समोर आलेत आणि समजदारीने lockdown करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळीच lockdown केले नसते तर आज रुग्ण करोडो च्या घरात असते. रुग्ण सेवेवर तणाव वाढलेला असता, Lockdown चा कालावधी आणखी जास्त वाढलेला असता, अर्थव्यवस्था आणखी खालावली असती. पण आता हळू हळू सगड सावरायला लागलं, सर्व कामे सुरळीiत सुरु झालीत. बाजारपेठा, व्यवसाय, सगडे क्षेत्र पूर्वपदावर येत आहेत.

आज भारतात 76,51,107 रुग्ण सापडलेले आहेत त्यातून 67,95,103 बरे होऊन घरी गेलेत आणि फक्त 7.50 lac active रुग्ण उरलेले आहेत. मृत्यू दर जगाच्या तुलनेत भारतात खूप कमी आहे. भारतातील जास्त फटका बसणारा राज्य हा महाराष्ट्र आहे. आज सुद्धा महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत कडक निर्बंध लादलेले आहेत, केंद्र सरकारने 15 october पासन शाळा सुरु करायला परवानगी दिली, मंदिरे, थिएटर, swimming पूल , ani बरेच काही उघडण्यास परवानगी दिलेली आहे तरी सुद्धा आपल्या राज्यात ह्यातील काहीच सुरु झालेलं नाही.

आज बाजारात किव्वा दुकानात गेल्यास 80% लोक हे विना मास्क दिसतात, स्वतः दुकानदार मास्क मध्ये नसतो.

महानगरात  परिस्थिती काहीशी बरी दिसली, लोक मास्क वापरतात. पण ग्रामीण भागात अशी परिस्थिती झालेली आहे कि सगडे जणू गाढव  झालेत. पंतप्रधान असो कि मुख्यमंत्री, सगड्यांचं ऐकतात, मान हलवतात पण जे सांगतात ते अमलात आणत  नाही. जणू काही आणखी lockdown होण्याची वाट पाहत आहेत कि काय असं वाटायला लागल. अशीच आपली वागणूक असेल तर सरकार ला बोट दाखवण्या आधी स्वतः कढे बघायला पाहिजे. काहीही बर वाईट झालं कि सरकार आणि प्रशासन जिम्मेदार आहे असं बोलतो, पण लोकशाही मध्ये लोकांची भागीदारी नसेल तर सरकार तरी काय करणार ?

आमच्या खेड्या गावात कुठला corona आणि कुठलं काय.? काही corona वैगेरे नाही सगडे पैस्या साठी करत आहेत, 1.50 लाख एका patient मागे भेटतात, म्हणून corona आहे असं सांगतात, आणि अश्या अनेक अफवा ग्रामीण भागात पसरलेल्या दिसतात. का ? कारण अफवांवर विश्वास सहज ठेवला जातो, fake massage वाऱ्या सारखा पसरतो  आणि लोक स्वतः निष्कर्षया वर येतात.

महानगरात स्तिथी सुधारलेली दिसते , रुग्ण वाढ कमी झालेली दिसते , पण आज ग्रामीण भागात जास्त पसरलेला दिसतो. वुहान ते आपल्या गावात येऊन पोहचलाय तरी हलगर्जी पणा गेलाच नाही. lockdown जरी काढलेला असेल पण corona विषाणू आपल्या आजू बाजूलाच आहे. विषाणू दिसणारा चष्मा असता तर गोष्टच वेगळी. पण तो दिसत नाही म्हणून स्वतः सावध राहिलेलं बरं.

महाराष्ट्र सरकारने आपले कुटुंब-आपली जवाबदारी मोहीम हाथी घेतलेली आहे जेणे करून लोकांना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेतीची जाणीव व्हायला हवी.

जागृत, जवाबदार, सतर्क राहणे हीच या काळाची गरज.

मास्क , शारीरिक दुरी, आणि हाथ स्वच्छ ठेवणे हे तीन शस्त्र आपल्या हाथात आहेत. यांच्या मदतीने  corona विषाणू पसरण्या पासून आपण हरवू शकतो.

संविधानात अनुच्छेद 51 क मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, त्यातील subclause (घ)मध्ये लिहले आहे कि

देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.

आज corona च्या पसरण्यापासून देशाचे संरक्षण करणे आणि जागृत आणि जवाबदार राहून राष्ट्रीय सेवा बजावणे हीच काळाची गरज.

- invisible truth

 

हिमांशु सागर शंभरकर

नागभिड,चंद्रपूर

22102020

 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू