तू नाही काळी हा समाजच काळा आहे
तू आहेसच का काळी, हा तुझाच दोष आहे,
गोऱ्या सुंदरतेला फासलेला तू काळीमा आहे
का काळ्या रंगाची तू जन्माला आलीस,आता लग्नाविना पोर तू, बापाचं ओझं मात्र होणार आहे
देव सारे गोरे, दैत्य काळे असा काळया पांढऱ्याचा भेदभाव आणि आपली आई महाकाली ह्या दोन्हीही आपल्या पुराणातच आहे
पण आपल्या समाजाने मात्र पुराणातील भेदभावच स्वीकारलेला आहे
पांढरा शुभ अणि काळा अशुभ असं मानणारा हा समाज, पांढरपेशा चांगला आणि काजळी रंगाचा वाईट हे ही स्वतःच ठरवून मोकळा झाला आहे
" तू कुरूप आहेस, काहीतरी कर ह्या काळ्या रंगाचं" ह्या बोचणाऱ्या शब्दांचा तू आता निषेध कर, तू नाही काळी तुला काळी म्हणणारा हा समाजच काळा आहे
