प्रेमास्तव
क्षितिज अंतर , प्रेमास्तव मोजले सखे मी
प्रेम तोलण्या , प्रेममापही योजले सखे मी
निस्तेज न व्हावे , रूप तुझे ऊनप्रहाराने झाकोळणारे वस्त्र रविला,साजले सखे मी
तुफानाने इजा न व्हावी, रम्य नयनांना रोखणारे वादळी यंत्र ,भाजले सखे मी
तव देखण्या लावण्य कांतीला, लाभो अमरत्व अस्मानी संकटांना , गरळ पाजले सखे मी
न पडो कष्ट तव कमल पदस्पर्शी
व्हावे धरणी , अंथरूण झुंजले सखे मी