पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आपत्ती काळात .....

आपत्ती काळात....


सरकारी माणूस

दिवस-रात्र सतत

सेवा देतच आहे

कोरोणाच्या लाटा

सजीव माणसाला

मजा वाटत आहे


सरकारी वास्तू

निवारा म्हणून

आसरा देत आहे

दानशूर माणसं

भूकेला म्हणून

अन्नदान देत आहे


सरकारी अन्न-छत्र

नको तिथे खुपच

दिसत आहे

गल्लीत अजूनही

गरजू उपाशीच

निजत आहे


बंदिस्त काळात

भाव वाढवून माल

विकत आहे

माणूसच संकट

माणसासाठी

उभे करत आहे


विलगीकरणच

जगण्यासाठी

फायदेशीर आहे

महामारीच्या

संकटावर फक्त

एकच उपाय आहे


सरकारी माणूसच

देवदूत आज मात्र

भासत आहे

सरकारी यंत्रणाच

जगण्यासाठी दैवी

वरदान ठरत आहे.


रक्ताचा माणूस

नात्यापासूनच

दूर उभा आहे

सरकारी माणूस

आपत्ती काळात

सेवा देत आहे


सागर तारानाथ शंभरकर

नागभिड जि.चंद्रपूर

9673769917

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू