पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पुतळ्याभोवती दिवे तेवले

दृष्य मनोहर मनी भावले

पुतळ्याभवती दिवे तेवले .........

 

काही होते साधे केशरी

रंगीत होते कही समोरी

लुकलुक चमचम काही करती

टेंभ्यासारखे काही मिरवती

ठिणगीतुनही काही पेटले

पुतळ्याभवती दिवे तेवले .........

 

थोडे उजळून त्या मुर्तीला

आवेश मोठा कुणी दावला

कुणी थांबले पायांजवळी

सवे घेउनी वातींची मोळी

इंधन संपुन काही विझले

पुतळ्याभवती दिवे तेवले .........

 

वावर त्यांचा नयन मनोहर

पुतळ्याभवती आज प्रहरभर

पण त्याला ना अप्रुप त्याचे

शल्य निराळे त्याला बोचे

ते काय पण कुणा कळाले ?

पुतळ्याभवती दिवे तेवले .........

 

त्या पुतळ्याच्या रोज समोरी

एक पणती जळे बावरी

प्रहरभर सार्या गर्दीत लपली

तिच अखेरीस होती विझली

तिनेच त्याचे शल्य जाणले

पुतळ्याभवती दिवे तेवले .........

 

अखेर वदला हसुन पुतळा

हवा कशाला हा सोहळा?

नको बाह्य तेजांच्या राशी

विचार माझे काय ठाव तुम्हांसी?

ते जर का ना तुम्हास कळले

कशास तुम्ही येथे जळले?

कशास तुम्ही येथे जळले?..............

 

दृष्य मनोहर मनी भावले

पुतळ्याभवती दिवे तेवले .........

 

©® दिपक सुर्यकांत जोशी

चिखली, जि:- बुलढाणा

9011044693

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू