पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुझी माझी भाऊबीज

 भाऊबीज ज़रा हटकेच  आहे
कारण तुझ्यामाझ्यात सातासमुद्राच अंतर आहे

पोस्टाने दरवर्षी न विसरता राखी पाठवणं चालूच आहे
पण स्वत:च्या हाताने तुझ्या मनगटी राखी बान्धण्याची उणीव मात्र तशीच आहे

लहानपणीच्या आठवनी अजूनही ताज्या तवाण्या आहेत
कुत्र्यामांजरयाची आपली भांडणं ही आठवण नसुन काल परवाच झाली असतील असं  मात्र वाटतं आहे

तू येणार म्हणून किती काय मी योजल होतं, पण विरहाचं दुःख कमी होतं की काय, त्यात ह्या कोरोनाने सुद्धा भर टाकली आहे

अचानक कधीतरी माझ्यासमोर येऊन मला आश्चर्यचकित करावास ही इच्छा दिवसेंदिवस मनात आता घर करु लागली आहे


आईविना पोर जसं पोरक असतं, तसं भावावीना माझी भाऊबीज सुनी सुनी आहे

तूझी माझी भाऊबीज जरा हटकेच आहे
पण तुझ्या माझ्यातल भाऊबहिणीच नातं मात्र जगावेगळ आहे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू