पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भाऊबीज स्पेशल

माहेर....

माहेर ह्या शब्दातच  प्रेम आणि वात्सल्य चे भाव  समावलेले आहेत, माहेरपण फक्त आई ने लेकीचच करायचं असतं असं नाही,कोणी अपल्या कड़े आले तर त्याचे रहाणे 'सोप करणे' म्हणजे माहेरपण,म्हणजे त्याला फक्त  घरातच नाही तर मनात ही जागा दिली कि ते सोपं होतं, आणि हे आपण अपल्या प्रत्येक पाहुण्या बरोबर  करू शकतो...!!

 आज असच मी एका वेगळ्या  माहेरपणा बद्दल तुम्हाला सांगु इच्छिते....!!

         भाऊ चे माहेरपण

भाऊ(मोठा) आला भेटायला मला, मी वीआरएस घेतले म्हणुन...!!

तेवढ्यात सरकारने घोषित केला देशा मधे लाॅकड़ाऊन...!!

अता काय सगळे जण पड़ले घरातच  अडकून... !!

अन् ह्या योगाने  सुरू झाले आमच्या भाऊचे माहेरपण....!!

बोलवल्या वर ही तो काही आला नसता रहायला,

पण लाॅकड़ाऊन मुळे का होईना त्याचा ही नाईलाज झाला,

मग काय अता,

झाला गप्पांचा दौर सुरू,उजळल्या जुन्या आठवणी....!!

त्यात अजुन भर घातली एलबम मधल्या फोटोंनी...!!

सकाळपासून आमची अखंड़ बडबड सुरू होत असे..!!

अधुन मधुन 'श्री' ही हां, हूँ  ???????? करत असे...!! 

पण,

सरकारचे हे बंद जरा जास्तच वाढत गेले...!!

भाऊलाही अता थोड़े संकोच वाटू लागले...!!

कळत नव्हतं जायची करावी कशी सोय..!!

अर्ज केला पास साठी अन् सरकार ने म्हणटल होय...☺

खुपदिवसा पासुन हे सगळं आई, फोटोतुन पहात होती..!!

मंद मंद गालातल्या गालातच ती  हासत होती..!!

मी म्हणाले आई ,योगायोगाने भाऊच माहेरपण घड़ले...!!

आई म्हणाली , छानच...!!तुमचे नाते अजून ही घट्ट झाले....!

म्हणाली, विश्वास आहे रहाल तुम्ही असेच नेहमी एकत्र...!!

पसरूद् या नात्याचा सुवास असाच अगदी सर्वत्र..!!


                                  शुभांगी आगाशे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू