पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रेवा तीरे

रेवा-तीरे

ओसाड त्या घरांवर,
पांघरला पाण्याने शेला.
नर्मदे च्या ओटीत,
गाव माझा गेला.

चिरेबंदी वाडा
वकीलाची निशाणी.
चहूकडे असेल का?
आता पाणीच पाणी.

हंबरणे गाई गुरांचे,
घुंगरमाळेंचे आवाज.
सगळेच शांत झाले,
फक्त नर्मदेची गाज.

जननी जन्मभूमी,
स्वर्गादपी गरियसी.
जननी केव्हाच गेली,
जन्म भूमी ही हरवली.

सैरभैर झाले,
साधे भोळे आदिवासी.
आमची माय नर्मदे,
कशी सोडशी आम्हासी.

अग तूचं आमचे जीवन,
तुझ्या कुशीत जग आमचे.
आता दुरून का तुझे?
फक्त दर्शन घ्यायचे.

रेवा माय गं तू आमची,
दे तहानलेल्यांना पाणी.
आम्ही तन्मय होवुनी गाऊ,
प्रेमानं तुझीच गाणी.

डाॅ.संध्या भराडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू