पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जगत्मिथ्या?

मन जाणते

त्या अंधाऱ्या वाटा

ती भयाण शांतता

मनाची खिन्नता, मन जाणते

 

मन जाणते

त्या बहरलेल्या बागा

ती हिवाळ्यातील प्रसन्न उन्हे

मनाची उभारी, मन जाणते

 

मन जाणते

तो सभोवतालचा गोंगाट

ती बाजारातील भाऊगर्दी

मनातील एकटेपण, मन जाणते

 

मन जाणते

तो आप्तांचा गोतावळा

ती हास्याची कारंजी

मनाचे रमणे, मन जाणते

 

कोण म्हणतो हे मिथ्या-माया

सारे खरेच असते

मनाच्या सर्व अवस्था

मन जाणते

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू