पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वाभिमान विकू नये.....


स्वाभिमान विकू नये.....!


घाई नकोच घेण्याची

विचारमंथन गरजेचे

आस नकोच देण्याची

भविष्यवेध गरजेचे


                                                       एवढी घाई का होती?

हातात दिलाच हात      

क्षणिक दिला आनंद

झटकून घेतला हात


क्षणाचे पाहून वागणे

सर्वस्व  अर्पूच नये

सर्वाचे असते सारखे

स्वाभिमान विकू नये


साधून संधी स्वार्थी

लोटून मारती डाव

उघडे पडेल अपुले

सजविलेले ते गाव


निष्णात तू प्रभावी

कसा गुंतला गाठीत

रेशीम वाटली क्षणी

गाठ होती बंदिस्त


-सागर शंभरकर

येरगाव सिंदेवाही

9673769917


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू