पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कोरोनाची जारती

जा देवी जा देवी कोरोना बाई

जाच तुझा मोठा, जाच निघुनि घाई

जा देवी जा देवी...

 

चीनकृपे पसरलीस, साऱ्या विश्वात

त्राहि-त्राहि केले, सर्वही खंडांत

जा देवी जा देवी...

 

अमेरिका ब्राझील, शरण आले गा

वाट अडवुनी तुझी, भारत उभा

जा देवी जा देवी...

 

रोखे आम्हा ऐसा, या जगती नाही

आज नाही उद्या, उपाय शोधू काही

जा देवी जा देवी...

 

घास घेऊ पाहतेस, आमचा सत्वर

शोधू व्हॅक्सीन, निघेल काटा परस्पर

जा देवी जा देवी...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू