पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काटेरी निवडुंग

1


स्‍वार्थी जगण्‍यापेक्षा


सलाम करीत गेला


उपाय न उरला तेव्‍हा


शोषण होत मेला


2


रडतेस वेदनेसाठी की


तुझ्या मागणीसाठी


हसतेस जगण्‍यासाठी की


माझ्या मरणासाठी


3


छायाचित्र बघत


रोजरोज झुरतो


तुझ्या आठवणीत


प्रेमवीर होत उरतो


4


कधी तुझ्यात असतो


कधी तुझ्यात नसतो


आरशात बघ वारंवार


तेवढाच दगाबाज दिसतो


5


गाईचें दूध आटले


वासरू विसरतो माय


दोघांचही प्रेम फाटलं


तरीही चवदार वाटते साय


6


तन तुझं लाजून घ्‍यायचं


मन माझं हरकून जायचं


सखे कळेल तुझ्या बापाला


सांग शेजारीच बँड वाजवू द्यायचं.


7


कौरवाचं राज्‍य असेल


तर ते वस्‍त्रहरण करतील


काय फरक पडेल पांडवामुळे


द्रौपदीचा ते डाव मांडतील


8


तू समोर असतांना


मी वेड्यागत बोलते


तू नूसतचं ऐकत


नागोबागत डोलतोस


9


तो गरजतो आभाळ


बरसतो त्‍याला पाऊस म्हण


ती चमकते चकाकते


कोसळते तीला वीज म्हण


10


प्रेमानेच होतो प्रेमघात


प्रेम प्रेमाचा मित्र


प्रेमच जोडतो प्रेमाला


प्रेमानेच मारतात अस्‍त्र


11


शब्‍द शब्‍दात शब्‍दप्रेम


शब्‍दप्रेमात शब्‍दगंध


प्रेम प्रेमात प्रेमभंग


प्रेमप्रेमात प्रेमरंग


12


माझं बोलणं


तुम्‍हाला पटणार नाही


ज्‍याचं पटतं


तुम्‍हाला ते रूचणार नाही


13


सुखाच्‍या शोधात


असतो जीवनप्रवास


दुःखाला कवटाळणारा


मिळतो सहवास


14


जाळून राख झाला देह


जळला नाही आत्‍मा


ललाटगिरी फासून राख


भगवा बनला परमात्‍मा


15


रामाने सितेला वनवासात धाडलं


राम मर्यादा पुरूषोत्‍तम


नवरा बायकोचं आजचं भांडण


शेजारी म्‍हणतो सर्वोत्‍तम


16


ज्‍याचं मन फुलावर


तेच फक्‍त प्रेम करतात


पतंगासारखे भिरभिरतात


गुच्‍छासाठी झुरझुरतात


17


काल तुषाराचं शिंपण


आज मुसळधार पाऊस


उद्याला गरजून पडणार


परवा शेतकरी चिखलात मरणार


आमचं कुठं अडणार


18


शासनाला असते माणूसकी


माणसं म्‍हणे भिक देतात


सग्यासोयर्यांनी केली का मदत


टेंबा मिरवणारे तरी कुठं चिक देतात


19


पेपरात बातमी छापा


समस्‍या तुमची सुटेल


पुढार्याची कार


दारासमोर येवून थाटेल


20


तुमची मिजास तुमच्‍या जवळ


बळीराजाला कुठलं काय


राज्‍यकर्त्‍यांचे पाय वळतील


असे गणगोत कुणी नाय


21


मायबापाचे फुलं


काशीला न्‍यावे


काशिराम हरपला


आता कुठं जावे


22


प्रेमातील फसवणूक


काटेरी अंत


निद्रिस्‍त थडग्‍यात


झोपला तो संत


तू महंत तुझां प्रेम महंत


23


अंतःकरणातील दुःख


जीवनाला छळते


प्रेरणा बनून सुख


मानवाला वहणावर कळते


24


चार माणसं जोडणं


फायदेशीर असते


मेल्‍यावर कळेल कुणा


खांदे कायदेशिर असते


25


अश्रू गाळून रडता तसे


पाऊसही रडत होता


आयुष्‍य सुखी जगतांना


बुद्ध कुणाला कळला होता







पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू