पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

show must go on

तु गेलास अन् माझ सगळ विश्व च बदललं...
कोसळले पार जणु हसुच हरवल....
जपुन ठेवल्या तुझ्या, आठवणी मी मनात....
जगत होते तशीच निराशेच्या कोषात...
आठवणींचा तो कप्पा घट्ट केला बंद....
विसरले सगळे सुख हरवले सगळे छंद...
एक दिवस मात्र उघड़ला तो कप्पा,
आनंदले मनी अन् मारल्या तुझ्या शी गप्पा...
तु म्हणालास अशी तु कोमेजून जाऊ नकोस...
माझ्या आठवणी त..इतकी हळवी होऊ नकोस...
मी म्हणाले, अरे सोप नाही एकट जगण...
तुझ्या विना एक, पाऊल ही पुढे टाकण...
तु म्हणालास...अग..!!
आनंदी राहुन ही, आठवणी येतात कि जपता ....
जगण खुप सुंदर आहे, येत जगाला दाखवता...
माझ राहिलेल अता जगायच आहे तुला.....
नाही दुःखी होणार अस वचन दे मला......
मी पाहिलेली स्वप्ने करायचियेत तुला पुर्ण...
माझ्या साठी च तु जगायच आनंदी राहु न....
खुप विचार केला अन् पटल बघ तुझ म्हणणं....
उद्या पासून सुरू करते अता आनंदी जगण..
ड़ोळे मिटले ,झोप लागली विचार करता करता...
एक सुंदर दिवस माझी वाट पहात होता....
अन् तु मात्र....!!
नेहमी प्रमाणे फोटो तुन तसाच मिस्कील हसत होतास...
तसाच मिस्कील हसत होतास...
वाटल,म्हणतोएस...
Show must go on..!!
Show must go on..!!                              शुभांगी ..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू