पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आली दिवाळी

दिवाळी

आली दिवाळी आली दिवाळी!


स्वच्छ घर खिडक्या अंगण!
स्वच्छ भिंती रांजण (टांकी)
स्वच्छतेचे घेऊन अभियान! आली दिवाळी


अज्ञान अंधकारा पळवत!
ज्ञानाचे फटाके फोडत!
मांगल्याचे दीप उजळत! आली दिवाळी


राग द्वेषा पळवून लावत!
मानापमान अपेक्षा पळवत!
दु:ख व्याधीला दूर ढकलत! आली दिवाळी


मानवतेचे तोरण बांधत!
शांतीचे आकाश दीप लावत!
प्रगतीचे स्वस्तिक कोरीत ! आली दिवाळी


करंजी कडबु लागु घेऊन!
शेव चकली मठिये घेऊन!
जगण्याचा आनंद घेऊन! आली दिवाळी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू