पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी हरवले...

मी हरवले...!!!

मी हरवले आज जिथे होते घनदाट जंगल ,

भावनांचे उंच ड़ोंगर उड़वत होते धांदल, 

कुठे कुठे वाहत होते खारे अश्रूंचे झरे,

तर कुठे होते दाटले विचारांचे वादळ खरे,

कुठे कुठे वाहत होता आनंदाचा गोड़ वारा,

कुठे पड़त होता कड़ू दुःखांचा गारा,

वाटत होता मार्ग हा अगदी सोपा व सरळ,

पण  अनुभवाचे काटे करत होते घायळ, 

भुलपडल्या सारखे होते तिथे चढण,

कारण मधे मधे त्यात होते आयुष्याचे घुमावदार वळण ,

खुप विचार केला अन् कळले  मी कुठे होते,

खरच...!!मी माझ्या मनाच्याच वनात होते, 

व  आठवणींच्या गर्दीत हरवले होते, 

आठवणींच्या गर्दी त हरवले होते...!!

                          शुभांगी...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू