पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनोगत


                 मनोगत
               ----------
प्रिय चि. रेवा,
           अनेकानेक आशिर्वाद. माझं   पत्र पाहून घाबरु नकोस,मी फक्त माझं मनोगत व्यक्त करायला हे पत्र तुला लिहीत आहे.
         तुला पाहायला आम्ही म्हणजे मी, हे आणि आमची मुलं सागर अन् अम्बर आलो होतो तेव्हां आणि नंतर १/२ महिन्यात जेव्हां जेव्हां आपण भेटलो मी हळू हळू तुला ओळखण्याचा प्रयत्न करीत आहे.कारण तू आमच्या घरात येणार आहेस तरी तुझ्या बद्दल मनात उत्सुकता आहे.
        एक तर तुझं रेवा नाव मला खूप आवडलं.कारण रेवा म्हणजे नर्मदा आपल्या मध्यप्रदेश मधील लोकांसाठी जीवन दायिनी नदी आहे.
       तुझं आकर्षक व्यक्तित्व खूप  आवडण्या सारखं आहे.माझ्या मते तुझ्या चेहऱ्यावर वर जी सुंदरता आणि आभा आहे ती वरवरची नसून तुझ्या मनाच्या सौंदर्या मुळे आहे.आणि मला वाटतं की सागर ला म्हणूनच तू आवडली असणार.
       आता तू लवकरच ह्या घरात येणार म्हणजे आपण बरोबर राहणार, तरी मी माझ्या इतक्या वर्षांच्या सुप्त इच्छा तुझ्या बरोबर पूर्ण करणार अगं शॉपिंग गं !

तुझ्या साठी खूप छान छान कपडे ,दागिने(अर्थात् तुझ्या आवडीचे च) आपण घेणार खूप मज्जा येणार.

         सासू सुनेच्या नात्याला त्रासदायक मानलं जातं(खरं म्हणजे नसतं) म्हणतात की दोघी एकदुसऱ्याला प्रतिद्वंदी समजतात.आधीच्या काळात ज्यास्त होतं आता ह्या भावना थोड्या मावळल्या आहेत.पण आपण दोघी ह्या नात्याला आधीपासूनच मैत्री नाव देऊ या.मी तुझं मन सांभाळण्याचा नक्कीच प्रयत्न करणार पण तरी तुला माझ्या वागण्यात काही चूक वाटली तर तू मनात ना ठेवता मला स्पष्ट सांगायचं अर्थात् मी पण तुला सांगणार आणि हो भाषा नक्कीच प्रेमाची असेल.

     अगं सागर लहान असल्या पासून मी त्याची खेळणी,पुस्तकं अन् दुसऱ्या अनेक वस्तू सांभाळायचे नं मग तू तर त्याची सर्वात आवडती व्यक्ती म्हणून तुला तर मी खूप प्रेमाने सांभाळणारच.

         तुझ्या कडून मी काही विशेष अपेक्षा नाही ठेवणार पण आपल्या घरा संबंधी, नातेवाईकां संबंधी काही इच्छा जरूर वेळोवेळी सांगणार . आपल्या घराच्या लोकांच्या आवडी निवडी ,आपल्या परंपरा,आपले काही लहान मोठे सणवार साजरे करण्याची पद्धत हळू हळू तुला सांगणार पण त्याचं पालन करायचं की नाही हे तुझ्या इच्छे वरच राहील.

           कपड्यांबद्दल माझं असं मत आहे की आपलं जीवन एक रंगमंच आहे तरी त्या त्या भूमिके प्रमाणे वेशभूषा केशभूषा करायला हवी अर्थात् आजकाल तुम्ही मुली खूप समजदार आहात.

         तू आल्या नंतर आम्हा सर्वांना नवीन नातं मिळणार आहे , मी सासू ,बाबा सासरे अंबर तुझा दीर होणार गंमतच आहे. अंबर थोडा खट्याळ आहे तरी तुमचं नातं छान खुलेल अशी आशा आहे. आणि पुढील१/२ वर्षात तुला नवीन मैत्रीण म्हणजे लहान जाऊ मिळणारच आहे,तुमची पण छान गट्टी जमणार.

         पत्र फार लांबलचक होत आहे आता लिहिणं बंद करते.
          असं म्हणतात "नदी मिळते सागराला " . माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत म्हणून अभिव्यक्त केल्या शब्दात.
          खूप शुभेच्छा, आशिर्वाद आणि सुस्वागतम्.
             हिंदी मध्ये मावशीला "मां सी" म्हणतात म्हणजे मां नहीं मां जैसी.
       तुझ्या आई सारखी (आई नाही) सासू सविता.
                 ---------
 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू