पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

डॉ. हेमलता दिखित

संस्मरण


डाॅ.हेमलता दिखित हिंदी साहित्यकारांची दी.
परवा 8 तारखेला दीदी गेली.
दीदी धार पी.जी.काॅलेजला प्रिंसिपल होती. इंग्रजीत पी.एच.डी.केलेली आमच्या दीदीची हिंदीत पाच पुस्तकं प्रकाशित झालेली.
एका लेखिकेने म्हटलं असं वाटतं नाही की दीदी गेली, म्हटलं नाही हो, अगदी डोक्यापासून पायापर्यंत वाटतंय दीदी गेली आता ती आमच्यात नाही!
त्याला कारणं ही तसेच आहे म्हणजे असं की आमच्या मठ्ठ डोक्यात इंग्रजीच थोडं फार ज्ञान आहे ते दीदीनं भरलय.
दीदी लेखिकेपेक्षा ही मोठी वाचिका होती. इंग्रजीत नवीन पुस्तक आल्याचे कळले की दीदी ते आणणार, आणि वाचून काढणार. दीदीचे वाचन म्हणजे महत्त्वाच्या ओळी पेंसिलनं रंगलेल्या.
पुढचा टप्पा अस्मादिकानां ऐकवणे,चांगल्या वाचकाला सवय असते जे चांगले आपण वाचले,ऐकले, पाहिले, ते कोणाला तरी सागंणे. म्हणजे एक तरं हे कळतं, आपली स्मरणशक्ती किती साथ देतेय दूसरे वाचतांना जिथे आपल्या डोळ्यात पाणी आलं तिथे श्रोत्यांचे डोळे पाणावले का?जिथे आपण स्तब्ध झालो, तिथे समोरचा ही झाला का?अशी प्रत्यक्ष प्रतिक्रिया वाचकाला प्रोत्साहन देते.
दीदीचे पहिले पुस्तक "घर की छावनी" . दीदी सैनिक परिवारातली सगळे नातेवाईक सैन्यात म्हणून शिस्त वक्तशिर स्पष्टवक्त हे सगळं जन्मजात मिळालेलं. पण तुसडी नव्हती उलट माणसं जोडण्याचा छंद होता आमच्या दीदीला. सगळी हिंदीसाहित्य समिति, लेखिकासंघ, आणि श्रीनगरची आसपासची सगळी माणसं तिचे आप्तस्वकीय होते.
"घर की छावनी" पासून सगळी पुस्तकं छापून आली की पहिली प्रत तिच्या ठाकुरजीला अन दुसरी मला मिळायची. पण मी एक ही पुस्तकं वाचले नाही कारण हस्तलिखिताचा शब्दनशब्द दीदी समोर वाचून दाखवायची.मग टायपिंगकाॅपी वर चर्चा व्हायची,शेवटी डमीत सुधार करायचा, या लांबलचक प्रकियेत दीदीचे, पुस्तकं प्रेसमधे छापले जायच्या आधी माझ्या डोक्यात छापले जायचे.
राहिला प्रश्न पायाचा, तर थंडीची सुरवात दीदीने दिलेल्या मोज्याने व्हयची. ही थंडी तशीच काढावी लागेल, मग कसं म्हणू की वाटत नाही दीदी गेली?
दीदीने केव्हां माझे पालकत्व स्वीकारले कळले नाही ,पण फोनने आज्ञा व्हायची पाऊस खूप आहे बाहेर पडू नको.
लिहते वाचते की नाही?
या प्रश्नाचे उत्तर नुसते हो म्हणून चालायचं नाही तिच्या शिस्तीत बसायचे नाही. काय वाचलं?काय लिहलं तो सम्पूर्ण अहवाल द्यावा लागायचा.
गर्मीत आईस्क्रीमचा पैक घेऊन यायची, आता सगळे संपले.
वेडेवाकडे प्रश्न तिच्या फौजी अनुशासन मधे बसायचे नाही मूर्ख म्हणून मोकळी व्हायची.
पण वासांसि जिर्णानी यथा विहाय श्लोकाची व्याख्या केली की म्हणेल किती विदुषी आहेस गं?
दीदीच्या बगीच्यात खूप फळे! सर्वांसोबत फोटो काढायची. पालक आला की पालक पकौडे चहा आणि नुकतच वाचून झालेल्या पुस्तका वर चर्चा ,दीदी बरोबर हा आनंद ही हरवला.
तिच्या ऑटोवाल्याचा मुलांचे शिक्षण, धोबी तर घरचाच! हे लोकं मना पासून सेवा करायचे.
अगदी आत्ता म्हणजे 25 अक्टोबरला संध्याकाळी दीदीच्या बगीच्यात आर्यमा, मी आणि दीदी चहा नाश्ता आणि गप्पा कविता,गझलची मैफल जमली. त्यात पंकज टोकेकरचा उल्लेख 'सर' म्हणायची त्याला कारण त्याच्या कॉम्प्युटर क्लासची दीदी वरीष्ठ शिष्या होती.
निघताना आर्यमाने आणि मी नमस्कार केला तर आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, अन सांगीतलं हम परसों हास्पिटल में जमा होंगे. ती एक स्वतंत्र,मनस्वी धारदार व्यक्तिमत्वाची शेवटची संध्याकाळ होती.
मृत्यूशी भांडली पण दवाखान्यातून बाहेर पडली, ती वासांसि जिर्णानी यथा विहाय.
या आठवणीत ती सतत आहे आणि नाहीही

डाॅ. संध्याभराडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू