पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गाणे

गाणे

तिच्या नजरेची भाषा
तुला कधी कळलीच नाही
कोमेजून गेली ती मग
कळी कधी फुललीच नाही !!धृ!!

मनी तिच्या होती आशा पदरी पडली ही निराशा
वाटले होते कधी तिला येऊन धरशील बांहूपाशा
आस तिच्या या मनीची
पूर्ण कधी झालीच नाही
कोमेजून गेली ती मग
कळी कधी फुललीच नाही !!१!!

तिच्यासाठी होतास खास सर्वत्र होई तुझा भास
सुखाच्या या कल्पनांनी सजवली होती तिने रास
रास ही तिच्या सुखाची
पदरात ही पडलीच नाही
कोमेजून गेली ती मग
कळी कधी फुललीच नाही !!२!!


बेसूर झाले तिचे गीत कसली हार कसली जीत
अबोल हा प्राजक्त झाला अबोल झाली ही प्रीत
तार तिच्या त्या सतारीची
पुन्हा कधी जुळलीच नाही
कोमेजून गेली ती मग
कळी कधी फुलली नाही !!३!!

अरविंद गणपुले

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू