पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शिक्षणाचे शिल्पकार

शिक्षणाचे शिल्पकार


समाजाच्या हितासाठी

योगदान तुझेच महान

तुच ठरलास महात्मा

ज्योतीस करुन महान

 

शेतकऱ्यांचा आसूड

ठरला खरा दिपस्तंभ

दिशा मिळाली दीनांना

उजळून आले प्रतिबिंब

 

शिक्षणाची गंगा निघाली

सावित्रीच्या योगदानाने

शिक्षिका पहिलीच ठरली

आपल्याच प्रेरक  प्रेरणेने

 

शिक्षणाचाचे शिल्पकार

शिक्षक दिनाचे हक्कदार

अंधाश्रद्धा निर्मुलन वादळ

जातीनिर्मुलनाचे भाष्यकार

 

महात्मा ठरला समाजाचा

स्त्री शिक्षणाचे शिल्पकार

ज्योतीस देऊनच आधार

स्त्री उन्नतीचा खरा आधार

 

शिक्षक दिन शोभला असता

आजच तो साजरा असता

समाजाचा भूषनच असता

महात्मा भारतरत्न असता

 

-सागर शंभरकर








पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू