पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पितृमुखी

*पितृमुखी*

जेव्हा जेव्हा मी आरश्यात डोकावते
तेव्हा बाबा मला बघत असतात
आपुलकीने.

जेव्हा जेव्हा मी आरश्यात डोकावते
तेव्हा बाबा मला बघत असतात
कौतुकाने

जेव्हा जेव्हा मी आरश्यात डोकावते
तेव्हा बाबा मला बघत असतात
उत्सुकतेने

जेव्हा जेव्हा मी आरश्यात डोकावते
तेव्हा बाबा मला बघत असतात
कळकळीने

जेव्हा जेव्हा मी आरश्यात डोकावते
तेव्हा बाबा मला बघत असतात
बारकाईने

कधी कधी मी आरश्यात डोकावते
तेव्हा बाबा मला बघत असतात
नवलाईने

कधी कधी मी आरश्यात डोकावते
तेव्हा बाबा मला बघत असतात
नाराजीने

कधी कधी मी आरश्यात डोकावते
तेव्हा बाबा मला बघत असतात.
सहानुभूतीने

कधी तरी मी आरश्यात डोकावते
तेव्हा बाबा मला बघत असतात
मिष्किलपणे

जेव्हा जेव्हा मी माझीच
सावली न्याहाळते
बाबा चालत असतात
लगबगीने

कधी कधी मी माझीच
सावली न्याहाळते
बाबा चालत असतात
उत्साहाने

कधी कधी मी माझीच
सावली न्याहाळते
बाबा चालत असतात
थकून पाय ओढत


हे मनाचे खेळ असतात का?
की सगळे असतात भास?
आई नेहमी म्हणायची
तू पितृमुखी आहेस खास

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू