पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निरोप


 निरोप   (कविता)~~~~~ ~~~~


जाणाराच सांगतो येणा-याच्या कानी 
रीत ध्यानात ठेवून जा, 
माणसं इथली खूप चांगली, 
हे कानात सांगून जा ....!
चुकलं असेल आमचं काही 
मन मोकळं करुन जा,
वागलो असूत दुष्टपणे 
तर माफ करुन जा,
पण माणसं इथली खूप चांगली 
हे कानात सांगून जा ....! 
विसरु नको कधी आम्हाला 
स्मरणात ठेवून जा, 
आलीच चुकून याद कधी तर 
संदेश देऊन जा, 
पण माणसं इथली खूप चांगली 
हे कानात सांगून जा .....!
जाणा-याला निरोप अन् येणा-याचे स्वागत 
संस्कृती लक्षात ठेवून जा, 
अलगद आम्हाला नववर्षाच्या 
कक्षात घेऊन जा, 
पण माणसं इथली खूप चांगली 
हे कानात सांगून जा ....! 
नव्याचे स्वागत तर सगळेच करतात 
अगदी मोठ्या धुमधडाक्यात करतात,
पण आमचा हा सीधा-साधा निरोप 
तू ध्यानात ठेवून जा, 
पण माणसं इथली खूप चांगली 
हे कानात सांगून जा, 
पण माणसं इथली खूप चांगली 
हे कानात सांगून जा ....! 

 


दिवाकर चौकेकर, 
गांधीनगर (गुजरात)
मोबाईल : 9723717047.

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू