पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निरोप आणि स्वागत

 

निरोप आणि स्वागत  (कविता)
~~~~~~~~~~~~~~~~


कोण म्हणतं की २०२० हे वर्षच वाईट गेलं ?अगदीच नाही म्हणायला 
थोड टाईट गेलं,
आणि काही प्रमाणात  
राॅग साईडही गेलं, 
पण मला तरी वाटतं 
की ते राईटच गेलं .... !


वर्षभरात जे घडलं 
त्यात त्याचा नव्हता दोष, 
कोरोना महामारीने मग
उडाले आमचे होश , 
चुक तर आम्हीच केली 
अन् द्वेष त्याचा झाला, 
अहो, जीवनाचा अर्थच तर 
त्याने समजावून सांगितला ...! 


विसरुन गेलो होतो आपण 
आपलीच जुनी संस्कृती, 
हात आणि पाय धुण्याची 
पुन्हा कळाली महती, 
जमवलेली संपत्ती 
कामा नाही आली, 
लोकांनीच लोकांची 
खरी मदत केली ....! 


म्हणून निदान आता तरी
त्याला नावं ठेवू नका,
फक्त लक्षात ठेवूत आपण 
आपल्याच चुका,
चांगलेच जाईल मग

येणारे नवीन वर्ष, 
प्रत्येक चेह-यावर दिसेल 
आनंद आणि हर्ष ....! 


म्हणून आता देवाकडे 
दुसरे नाही काही मागत, 
जाणाराला देवूत निरोप 
येणा-याचे करुत स्वागत,  
जाणाराला देवूत निरोप 
येणा-याचे करुत स्वागत ....! 

 


दिवाकर चौकेकर, 
गांधीनगर (गुजरात) 
मोबाईल :  9723717047.

 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू