पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुच माझा विलु आणि तूच माझा पिलू


शीर्षक  :  " तुच माझा विलू आणि तूच माझा पिलू "



माझे बाळ जेव्हा दूर असताना, मी  परगावी असताना 

मनात सुरु असते कायम भितीयुक्त  द्वदं.

असे वाटते ऑफिस, ट्रेन, शहरे सर्व होऊ दे पूर्णपणे बंद.


पप्पा पप्पा गोड हाक ऐकतो, तेव्हा होतो मला 

आभाळाइतका आनंद.

कारण बाळा तुच माझा विलू आणि तुच माझा पिलू.1!!



छोटया चिमुकल्या हातांचा, गोड पाप्यांचा, 

आणि सुंदर मिठीचा राहों पाशबंध.

बोलक्या,  तोतऱ्या आवाज  ऐकून  वाटते व्हावे मतिमंद.


बाळाच्या  माझ्या स्पर्शाचा, खोडकर खोड्यांचा  मला छंद.

अमृतासारख्या  प्रेमात,  बाळाच्या  गोड मस्तीत  मी धुंद.

कारण बाळा तुच माझा विलु, आणि तूच माझा पिलू.  !!2!!



पिलूच्या  जिद्दीला,प्रेमाला करू नको देवा कधीही प्रतिबंध.

श्वासात श्वास असेपर्यंत , जिवंत ठेव देवा माझ्या सोबत  मायेचा सुगंध.


कारण बाळा तुच माझा विलु  आणि तूच माझा पिलू   !!3!!




श्री.  लव  गणपत  क्षीरसागर
विक्रोळी  मुंबई .
M0: 9867700094

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू