पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बेईमान अश्या या नजरा

तुझ्याकडे बघण्याच्या किती ,
घाणेरड्या गं या नजरा,
परत परत फिरून उठतात,
या बेकार लोकांच्या नजरा,
तरीही तू आपला मान विसरुन,
का करतेस गं तू परंपरेचा मुजरा???

तू बाळाला दूध पाजतानाही,
तुझ्या स्तनावर फिरणाऱ्या या अघोरी नजरा,
तू बाळाला भरवशींन की,
मग चुकवतचं राहशीन ,
पदर झाकूनचं अश्या नजरा???

तुझ्यावर अतिप्रसंग होता,
पाहत राहतील या मेलेल्या नजरा,
कुठे फाटलं का कापड,
त्या छिद्रातून झाकून पाहतील अश्या जालीम नजरा,
पण कुठे शोधूनही सापडणार नाही,
मदत करणाऱ्या त्या गर्दीत अश्या नजरा???

तू मटकली तरी तुला,
माल,सामान,छर्रा आहे म्हणतील,
अश्या या हलकट नजरा,
एवढी कशी कुप्रवित्ती बळावली गं,
या अमानवी समाजात,
सगळीकडे भरल्या अश्या या,
जनावरापरी झाल्या या नजरा....

वेड्यावाकड्या इशारे करून,
हिंणवणाऱ्या या नजरा,
तू ही थोडा आपुलकीचा प्रतिसाद दिला तर,
तुला धंदेवाली वेश्या,रांड म्हणणाऱ्या या नजरा,
पण यांच्या शरीराची तू स्वतःहा झोपून,
स्वतः कळा शोषून,
तहान भागविणारी तूच आहे,
असं विसरणाऱ्या अश्या या पापी नजरा...

भर वयात नवरा मेला तरी,
तुझ्या यौवणाला पिळून खाऊ,
अश्याच भाषा बोलणाऱ्या या जालीम नजरा,
तुझ्या छातीचा आकार केवढा आहे,
हे दुरूनच मोजणाऱ्या हरामी अश्या नजरा...

तूच लहानाच मोठं केलंस,
छातीचं दूध पाजूनच यांना,
हे विसरून साले भडवे,
तुझ्या दुधाला बेईमान झाल्या अश्या नजरा,
मी म्हण की हा समाज म्हण,
सर्व झाल्या या पापी वासनेच्या नजरा....

तू मेल्यावर ही,
तुझ्या गोऱ्या अंगाला पाहून,
मनात वासनेचा वारा उठणाऱ्या या नजरा,
तुझ्या मनाचा,तुझ्या प्रेमाचा नाही,तर,
तुझ्या शरीराचा आकार पाहून प्रेम करणाऱ्या,
अश्या किन्नर झालेल्या या नजरा...

पण एवढं करूनही,
तुझ्या सहनशीलतेचा कधी आटला नाही झरा,
तुझ्या सहनशीलतेला,
तुझ्या त्यागाला,
तुझ्या अंगी असणाऱ्या धेर्याला,
माझा मानाचा असा मुजरा.....

                सुरज मु. कांबळे

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू