पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रसन्न पहाट

सारून धुक्याची चादर

हलकेच सूर्य उगवतो,

रात्रीच्या पोटात जणू

उषःकाल उद्याचा असतो.

 

प्रभात प्रसविता अनायास

निशेस होत ना वेदना,

पक्ष्यांच्या कोलाहलातून

जणू आनंद तिचा प्रकटतो.

 

रात्री पाहिली जी स्वप्ने

फुले होऊन ती उमलती,

बहर उमेदीचा

चराचरी व्याप्त असतो.

 

मनी उल्हास जागवीत

वाहे शीतल वारा,

नवजागृत मनाला

संसार सुखाचा गमतो.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू