पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मकरसक्रांत

मकरसंक्रात

सूर्य प्रवेश करता मकर राशीत,येई मकरसंक्रात
रंगीत पतंगांची आकाशी भरारी,जोषात साजरी मकरसंक्रात!

थंडीचा शहारा अन् सुखांचा सोहळा,दु:खांवर मात
मैत्री लाभावी,तीळगुळ हाती ठेवीत!

रसाळ ऊसासा पेर, हुरडा अन् बोर,संक्रांतीचे वाण
मुली,बायका करती काळे वस्त्र परिधान!

एवढासा तीळ त्याची गुळासंगे मोठी गोड लज्जत
तीळ-गुळाचा सुगंध,जेवणास वाटे अवीट गंमत!

जीवनात दु:ख असावे तीळासारखे लहान
जीवनात आनंद येवो गुळासारखा महान!

शुभेच्छांनी अशा साजरी व्हावी मकरसंक्रात छान
'मकरसंक्रांतीची गोडी जपणे आयुष्यभर 'हेच खरे वाण!

शब्द © सौ.मीना उल्हास करकरे,ठाणे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू