पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्तन कर बंद करणारी वीरांगना

शीर्षक वाचून तरी धक्का लागला असेल??? नक्कीच लागला असणार! जन्म झाल्यावर आई आपल्याला ज्या स्तनातून दूध पाजायची त्याच स्तनावर फार पूर्वी काळी "स्तन कर'' लागत असायचा??? सर्वाना प्रश्न पडला असेल की नैसर्गिक असलेले हे स्तन आणि यावर सुद्धा कर द्यावा हे जरी वाचताना धक्कादायक असलं तरी हे खरं होत....स्त्रियांचा इतिहास,स्त्रियांना जे काही सहज आज मिळत आहे त्यामागचा त्रास आणि त्यामागचा इतिहास हा आपण समजतो तितका सोप्पा नाही..मग तो शिक्षण घेण्याचा अधिकार मिळविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी झेललेल्या समाजाच्या हालअपेष्टा,किव्हा मतदान अधिकार मिळावा यासाठी झालेली आंदोलने,किव्हा वारसा हक्क किव्हा महिलांना गादीवर बसण्याचा अधिकार नाही यासाठी झालेली लढे ज्यात अहिल्याबाई,झाशी राणी,ताराबाई शिंदे,इत्यादी आपणांस उदाहरणे पाहता येतात,आणि हे तेवढंच यशस्वी सुद्धा आहेत...असाच एक लढा स्तन करावर दिल्या गेला...
              त्रावणकोर येथे फार प्राचीन परंपरा होती कनिष्ट जातीच्या महिलांनी ,किव्हा पुरुषांनी छातीचा भाग म्हणजे स्तन उघडे ठेवायचे..आणि जर ते झाकून ठेवल्यास तो गुन्हा समजला जायचा..आणि ज्यांना आपले स्तन झाकून ठेवायचे असल्यास त्यांनी यासाठी एक वेगळा कर द्यायचा,ज्याला स्तन कर म्हणून म्हटल्या जात असे...१९०० च्या मध्यापर्यंत हा नियम अगदी प्रचलित होता..एका राणीने एका दलित स्त्री ला आपले स्तन झाकून असतांना पाहिले,त्यामुळे त्या निष्टुर राणीने असा आदेश दिला की त्या स्त्री चे स्तन कापण्यात यावे...एवढी भयानक स्थिती ही त्या काळी महिलांची होती...आज ही तेच काहीश्या प्रमाणात दिसून येते..ब्रिटिश राज्यकर्ते सुद्धा राज्य करण्यास आले तेव्हा ही हा स्तन कर लागू होत,जे आपले स्तन झाकतील त्यांनी हा स्तन कर भरण्यात यावा असे फर्मान असे,,आणि ज्यांनी तो कर भरला नाही त्यांना शिक्षाही भयानक स्वरूपात असे...
            अश्या या वातावरणात नंगेली जे केरळमध्ये गाव आहे तेथील एका महिलेने स्तन कर विरोधात लढा दिला...त्या स्त्री चे नाव मुल्क्क्रम असे होते...
या स्त्री ने कर भरण्यास नकार दिला तेव्हा तिला बंदी बनवून राजामसोर आणण्यात आले,तेव्हा मुल्क्क्रम या स्त्री ने  स्तन कर भरण्यास विरोध म्हणून स्वतःची दोन्ही स्तन कापून केळीच्या पानावर राजासमोर ठेऊन दिले...रक्त जास्त प्रमाणात गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आणि तिला वाचविण्याचा प्रयत्न करत तिच्या पतीने कंदापन याने पेटत्या अग्नीत उडी घेऊन आपला जीव दिला,तेव्हा कुठे राजाला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तो स्तन कर रद्द करण्याचा आदेश दिला...नंतर हे ठिकाण ''मुलांचीपा राम्बु" म्हणून ओळखले जाते ज्याचा अर्थ मल्याळम मध्ये स्त्रीच्या स्तनाची जमीन असा होतो...
       हा लेख आपल्यासमोर लिहिण्याचा उद्देश हाच की आज ही महिला या कुणाच्य दबावाखाली जगत असतात,साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर निवडणूक असताना बायको सरपंच नाममात्र असते आणि वास्तविक शासक हा नवरा असतो,अश्या प्रकारची आजची स्त्री आहे,तिने यासाठी किव्हा अत्याचार ,बलात्कार,हुंडाबळी,मासिक पाळी विरोधात आंदोलन करून,या समाजाला,या पुरुषी प्रधान वर्चस्वाला आव्हान दिले आहेतच पण अजूनही निडर होण्याची गरज आहे ,समाजासाठी झटणाऱ्या सर्व स्त्रियांना त्रिवार अभिवादन...

लेख-
सुरज मुकिंदराव कांबळे...

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू