पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शब्द

शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे काय?
शब्द म्हणजे काय? शब्दात सांगावं कसं?
शब्दांंच सामर्थ्य शब्दांत वर्णावं कसं?

कधीतरी मन उगाचं उदास होतं
अन भरकटत जातं कुठेतरी दूर दूर
भुुुुुुुुतकाळात..... अंंतराळात.....
शेेवटी हृदयाच्या सुप्त भावभावना
लेखणीतून कागदावर उतरतात
हृदयाला दुःखद यातना देऊन
कुठंतरी मनाला शांती देेेेऊन
हेेेे शब्दच असतात.....

शब्द कधी निर्मळ जलाचं रुप घेतात
तर शब्द कधी चिखलात रुतून बसतात
शब्द कधी दुखावल्या मनावर फुंकर घालतात
तर शब्द कधी जखमी हृदयावर घाव घालतात
हेेच शब्द कधी फुलाचं रुप घेतात
तर कधी खुरूप होवून सलतात

शब्द शब्दातून उमलतात
शब्द शब्दातून उमलतात..... फुुुलतात
शब्द शब्दाबरोबर बहरत जातात
अन..... शब्द शब्दातूनच कधी संपतात
हेेेे शब्दांनाही कधी उमजत नाही.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू