पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कविता

ज्ञानदा -सावित्रीबाई 


समाज सुधारक सावित्रीबाईंची महती काय वर्णावी? समाजकंटकांनी त्रासले तरी अखंड व्रत चालवी!


कर्मयोगी सावित्रीबाई जशी धगधगती मशाल 

'त्यांचा वारसा थांबवेल कोणी', आहे का मजाल? 


'चुल-मुल' च्या जमान्यात मुलींना हाती लेखणी दिली 

पहिली शाळा मुलींची चालवून महिला शिक्षिका बनली


'सावित्री -जोतिबा' झटले ज्ञानी करण्यासाठी जनता 

त्यांचे स्वप्न साकार झाले मुली मुल शिकली पाहता पाहता 


धन्य त्या सावित्रीबाई त्यांच्यामुळे आम्हास शिक्षण लाभले 

पावन झाला स्त्री समाज ह्या क्रांतिकारीणीमुळे 


मराठी कविता केल्या ,  रमल्या मुलीबाळी

शिक्षणाची गोडी अविट लावली ह्या स्त्रीशक्तीनी 


त्यांचे नाव माहित नाही, असा माणूस ना मिळेल 

पुणे विद्यापीठ अखंड 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 'नावाने शोभेल! 


                                     सौ.मीना उल्हास करकरे


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू