पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नवा संंकल्प

सखे,

Calendar बदललयं भिंतीवरचं,

तुझं नेहमीचं आयुष्य पण आता बदलायला हवयं,

मान्य आहे नाहीयं तुला पूर्ण करायची ऑफिसची टार्गेट्स,

नाहीयं तुला शाळेची धावपळ,

पण म्हणून तुला काय त्यातलं काहीच कळत नाही?

ह्या वर्षी स्वतःचा शोध घ्यायचा संकल्प कर.

कळू दे सगळ्यांना तू ही एक माणूस आहेस,यंत्र नाहीस,

तुझ्या भावभावनांना आता दाबून ठेवू नकोस,

व्यक्त हो,मोकळी हो,स्वतःच मत मांडायला शिक,

ह्या नवीन वर्षात सगळ्यांसाठी कामे करता करता,

थोडासा वेळ स्वतःला दे,बघ आरशात आपलं रुप,

निरखून बघ केसांमधून डोकावणारी रूपेरी चांदी,

त्या छबीवरही माया कर.देवाने दिलेली ही काया जप.

ह्या नववर्षात तू पुन्हा नव्याने जग,

थोडं दुसऱ्यांसाठी आणि खूप काही स्वतःसाठी.


अनघा जगदळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू