पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी लेक सावित्रीची

           मी लेक सावित्रीची

प्रथेच्या नावाखाली होणारे अत्याचार रोखणारी

क्रूर व अन्यायी प्रवृत्तीचा विरोध करणारी

सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची जोपासना करणारी

होय मी लेक सावित्रीची.....


घराचा उ़ंबरठा ओलांडला आता

अस्तित्वाच्या पाऊलखुणांची

 आत्मविश्वासाने घेते कर्तृत्ववान भरारी

     होय मी लेक सावित्रीची.....

 

कितीही संकटे आली तरी न डगमगणारी

आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारी

मी ही माणुस आहे मला ही भावना आहे

हाच माणुसकीचा  धर्म शिकवणारी 

होय मी लेक सावित्रीची......


दबलेल्या आवाजाची 

आता व्यक्त झालेली स्त्री

स्वतः च्या प्रश्नांना वाचा फोडणारी

आजची स्त्री 

नवे क्षितिज नवे युग निर्माण

करणारी

होय मी लेक सावित्रीची.....


भावनांची लक्तरे

प्रखरपणे मांडणारी

संवेदनांच्या जाणिवा आपल्या 

 लेखनातून पोचवणारी 

होय मी लेक सावित्रीची......



शब्द सुचले तेच पेरलेही

नवनिर्मिती तून काव्य फुले 

फुलवणारी

 त्या दिलेल्या शब्दांना जागणारी 

होय मी लेक सावित्रीची.....


मी एक शिक्षिका

घेतलाय वसा शिक्षणाचा

जपली जाईल क्रांतीज्योतीची 

प्रतिमा

परिवर्तनाच्या मार्गाने आपली 

दिशा ठरवणारी

होय मी लेक सावित्रीची....


जगाला जिंकणयापैक्षा स्वतः ला 

जिंकणारी

काळ कितीही बदलला तरी

कर्तृत्वाने पूढे जाणारी

होय मी लेक सावित्रीची.....


निंदा असो की स्मृती असो कोणत्याही

प्रलोभनांना  न जुमाननारी

समतेच्या सम्यक विचारांना

निष्ठेने सिद्ध करणारी 

  होय मी लेक सावित्रीची.....

होय मी लेक सावित्रीची......

@कु. अस्मिता सावंत

उल्हासनगर- ठाणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू