पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी आई

माझी आई माझी पहिली गुरु

तिच माझी अध्यात्मिक सद्गुरु

माझी आई आहे साधी भोळी

तिला चालू आहे आता मधूमेहाची गोळी

तिच्याजवळ आहे संस्काराची मोळी

तिच बाळगतो आम्ही लेकरं वेळोवेळी

माझी आई स्वयंपाकामध्ये सुगरण

करते चिमकु-याच्या पानांचं वरण

देवावरती तिची अपार भक्ती

म्हणून तर अभंग लावण्याची करते आम्हा सक्ति

माझी आई दिवसभर करते खुप कष्ट

होत नाही कधी आम्हा लेकरांवर रूष्ट

फावल्या वेळेत ती करते देवाचा जप

वाढवते आपला अध्यात्मिक तप

तिचे एकच अंतिम ध्येय मोक्ष

त्यासाठीच ती नेहमी दक्ष

घेत नाही कधी कुणाचा पक्ष

आपल्याच कामावरती तिचे नेहमी लक्ष

ती आहे SSC

म्हणून केली मला MSc

तिच्या जीवनी खुप संघर्ष

तरी तिने कमी होऊ दिला नाही कधी हर्ष

माझ्या आईला चार भाऊ

आणि एक माऊ

तिला नाट्यसंगीताची आवड

त्यासाठी ती काढे सवड

ती करते आम्हा लेकरांची सेवा

तिला नाही कधी कुणाचा हेवा

तिच्या मोक्षासाठी देवा करतो मी तुझा धावा

ती आहे सत्वगुणी

म्हणून आम्हा लेकरांना केलं सद्गुणी

ती आहे खुप सहनशील

कारण तिचे अंतःकरण भावनाशील


कवी- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती

        मु.पो.अणदूर

        ता.तुळजापूर

        जि.उस्मानाबाद

        ४१३६०३

        महाराष्ट्र राज्य

        भ्रमणध्वनी- ९३२६८०७४८०




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू