पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तंत्र उद्याच (AI & ML)

*तंत्र उद्याच*

*AI and ML* 

 

एक वेगवान दुचाकी स्वार जोरातच  सी. एस. एम. टी. स्थानकाजवळून जात होता. त्याच वेगाने तो दुचाकींना प्रतिबंधित असलेल्या जे. जे. उड्डाण पूलावर घुसु पहात होता. परंतु तेथे तैनात असलेल्या वहातूक पोलीसाने त्यास अडवून उड्डाणपूलावरुन जाण्यास परावृत्त केले. त्याच त्वरेने दुचाकी स्वाराने मार्ग बदलत पुलाच्या खालून बाजूचा अपेक्षित योग्य रस्ता धरला. 

 

जे. जे. पूलावर दुचाकींना मज्जाव आहे. कारण दुचाकी स्वार या थेट मोकळ्या पूलावरील रस्त्यावर अंदाधुंद गाडी चालवताना प्राणांतिक अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी पूलाच्या प्रवेशाजवळ कायमचे अडथळे तर लावले आहेतच पण सोबतच पुलाच्या दोन्ही बाजूला चोविस तास  वहातूक पोलीसही तैनात करावा लागतो. 

 

सहजच विचार आला, इथं वहातूक पोलीसाच काम एखादा 'रोबो' करु शकेल का ? म्हणजे ऊन, वारा, थंडी, पाऊस, तिन्ही त्रिकाळ पोलीस तैनात करावा लागणार नाही. पण 'रोबो' हे काम कसं करु शकेल ? त्याला प्रोग्रॕम केल्यापूरतं तो कार्य करणार. तो एखाद्या दुचाकीस्वाराला किंवा फारतर दुचाकींवर येणाऱ्या झुंडीला अडवून योग्य मार्गावर परावर्तित करु शकेल. परंतू अशा 'रोबो' ला हुशार दुचाकीस्वार चकवा देऊन उड्डाण पूलावर जाऊ शकतील कारण प्रोग्रॕम्ड 'रोबो' ला जेवढ सांगितलय गेलय तेवढ़च काम करणार. परंतू रस्त्यावर क्षणा क्षणाला, अवचित बदलणाऱ्या परिस्थितीशी रोबो कसा जुळवून घेणार ? आणि प्रत्यक्षात उभ्या असलेल्या पोलीसाची निर्णयक्षमता व अपेक्षित कामाची अंमलबजावणी होऊ शकणार नाही. म्हणजेच AI अर्थात रोबो ची कृत्रिम बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, अंमलबजावणी तोकडी पडेल ! ऐनवेळी योग्य कार्यक्षमते आभावी सुसाट आणि चणाक्ष दुचाकी स्वारांना रोखण्यात रोबोची बुद्धिमत्ता प्रभावी ठरणार नाही ! 

 

अशीच दुसरी बातमी वाचनात आली.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते/दिग्दर्शक रामगोपाल वर्मा कायमची मुंबई सोडणार. मुंबई ऐवजी आता ते गोवा राज्यात आपलं कार्यालय थाटणार आहेत. आता कोणीही कोठुनही काम करु शकतो. आणि कोरोना पाश्चात काळामधे प्रत्यक्ष भेटी-गाठी अथवा मिटींग्जची आवश्यकता उरलेली नाही. व्हिडिओ काॕन्फरंन्स आणि इतर संपर्कमाध्यमातून सर्वसाधारण माणूस देखील हे काम हव तिथून करु शकेल हे आपण जाणतोच. त्यांनी दिलेली कारणे ही नवीन युगाची नांदी आहे. 

 

'वर्क फ्राॕम होम' पध्दती ने काम होऊ शकत हे कोरोना पाश्चात काळात आपण पाहतोय. किंबहूना कार्यस्थळी जाण्यायेण्याची तयारी, त्रास, आणि वाया जाणारा वेळ वाचतो. या वाया जणाऱ्या वेळेचा सदुपयोग कर्मचारी घरी बसून ही काम करण्यासाठी होऊ शकतो. 

 

आणखी एक उलथापालथ या मूळं होईल, ग्रामीण भागातील मुलंही थेट शहरातील अथवा जगातील कोणत्याही कंपनीसाठी काम करु शकतात. यामूळं कदाचित आय. टी. क्षेत्रासह इतरही उद्योगांचा चेहरामोहराच बदलून जाईल ! शहरांच महत्व कमी कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था बाळसं धरु लागल्यास शहरातील गर्दी कमी होऊन ग्रामीण भागात नवनवीन माॕल्स, मनोरंजनासह नागर संस्कृती अधिक वेगाने विकसित होऊ शकेल का ? हे पहाणं औचित्याच ठरेल. 

 

वर उल्लेखलेली तीन-चार उदाहरणे वानगी दाखल आहेत. हे सर्व शक्य होण्यासाठी तंत्रज्ञान पूढची झेप घेण्यास सज्ज होतय. ते 'AI' म्हणजे 'आर्टिफिशिअल इंटीलिजन्स' आणि यावर आधारित 'ML' 'मशिन लर्निंग' तंत्राचा वापर होऊन बरेचसे जाॕब केले जातील. मनुष्यबळाची जागा या नवविकसित तंत्राधारीत मशिन्स घेतील. 

 

या तंत्रज्ञानाचे फायदे तोटे आहेतच. फायदा होईल तो एखाद्या कामासाठी माणसाच्या 'नैसर्गिक बुद्धिमत्ता' आणि 'स्वःजुळणी कार्यशैली' वर अवलंबून रहाण्याची आवश्यकता संपेलेली असेल. या यंत्रांद्वारे दिवसरात्र स्वस्तात आणि बिनबोभाट अपेक्षित कामं वेगाने होऊ लागतील. 

 

मणुष्यबळाला पर्याय म्हणून बहूदा (AI) 'कृत्रिम बुद्धिमत्ता' आणि (ML) म्हणजे 'स्वःजुळणी आकलन तंत्र' प्रणालीच्या अत्याधुनिक मशिन्स ने कामं होऊ लागली तर बेरोजगारी वाढू शकते ! 

 

भविष्यात बदलत्या परिस्थितीला सामोरे तर जावचं लागेल. कदाचित भविष्यात आगळ्या संधी उपलब्ध होतील. AI आणि ML बाबत अधिक माहिती घेऊया पुढील लेखामधे.

 

क्रमशः 

 

ML- (Machine Learning)- शब्दाला 'स्वःजुळणी आकलन तंत्र' हा मराठी शब्द शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे. 

 

घनश्याम परकाळे

६ जानेवारी २०२१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू