पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रकाशन

सर्वस्पर्शी प्रतिभावंत आणि चौरंग ह्या ग्रंथाचे  कविसंमेलनात प्रकाशन


जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद व भरारी साहित्य मंच नागभिड चे आयोजन


दि. ३१ जाने.२०२१ रोजी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद नागभीड, भरारी साहित्य मंच द्वारा आयोजित साहित्य संमेलनात लेखक समीक्षक पुनाराम निकुरे, तळोधी (बा.) यांच्या सर्वस्पर्शी प्रतिभावंत या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ. राजन जयस्वाल यांचे हस्ते करण्यात आले.  सदर ग्रंथ क्रिस्टल पब्लिकेशन पुणे निर्मित साहित्यिक संजय येरणे यांच्या समग्र साहित्यावरील आस्वादक समीक्षा ग्रंथ म्हणून साकार करण्यात आलेला आहे.

तसेच संजय येरणे साहित्यिक यांच्या *चौरंग* ग्रंथाचे ई प्रकाशन उद्घाटक संजयभाऊ गजपुरे, जि. प. सदस्य चंद्रपूर, प्रसिद्ध कवी इरफान शेख चंद्रपूर, गजलकार मंगेश जनबंधू, नेताजी  सोयाम, प्रमोद चौधरी,संजय येरणे  पुनाराम निकुरे साहित्यिक, सागर शंभरकर सर, डॉ श्रीकृष्ण देव्हारे यांचे हस्ते पार पडले. या प्रसंगी बंडू कत्रोजवार स्मृती प्रथम साहित्य सन्मान २०२१ पुरस्कार पुनाराम निकुरे यांना प्रदान करण्यात आला. दुसऱ्या सत्रात इरफान शेख कवीसंमेलन अध्यक्ष यांच्या उपस्थितीत 40 हून अधिक कवींनी बहारदार कवितेचा मनाला रिजवणारा पाऊस पाडला.शेकडो रसिकांच्या उपस्थितीत  बहारदार प्रकाशन समारंभ व कवी संमेलन आयोजन अध्यक्ष पराग  भानारकर, सचिव सारंग भोयर, उपाध्यक्ष कार्तिक हजारे, यश कायरकर, रवींद्र जांभळे, सतीश जीवतोडे, आशिष गोंडाणे सर, , ज. तु. सा.प. द्वारा समेलन यशस्वी करण्यात आले.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू