पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हे पृथ्वी माते

हे पृथ्वी माते तू अनादि, अनंत आहेस....तुझे गुणगान गाण्यासाठी माझे शब्द अपुरे पडत आहेत.पण तरीही तुझ्या लेकराचे हे प्रेमळ शब्द...


तू विश्व माझे शतस्वप्नांनी सजलेले

तू मन माझे मायेच्या ऊबेने पांघरलेले

तू गीत माझे स्पंदनाच्या स्वरांनी गुंफलेले

तू कवच माझे रक्षणाच्या वचनाने बांधलेले...


तू शब्द माझे आपुलकीच्या धाग्याने ओवलेले

तू कर्तव्य माझे स्वाभिमानाने आखलेले

तू रक्त माझे अन्यायविरोधी सळसळणारे

तू प्राण माझे यशाच्या श्वासासाठी झुंजलेले...


                *लेखन = नेहल जोशी*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू