पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्य

                         " आयुष्य  "

" जिंदगी एक सफर  है सुहाना,
यहा कल क्या हो किसने जाना "
ये गाणं आपल्या सर्वांना परिचित आहे आणि ते
ऐकून आनंद ही मिळतो..
नक्कीच आपण  या गाण्याचा अर्थ समजून जगू या.

खरे आयुष्य कसे जगता येईल याचा विचार करु या.
मला हे वर्ष 2020 वाईट स्वप्न आहे समजून विसरून जावे असे वाटते. नको भयंकर आठवणी, दुःख, चिडचिड, यापुढे भावी आयुष्य आनंदी जावो ही ईश्वराकडे प्रार्थना करु या.

काही कटू प्रसंगा मुळे  मला  आयुष्या  बद्दल ग्रहण प्रश्न  पडू लागले  आहेत. कदाचित तुम्हाला ही?
आयुष्य म्हणजे काय?  आणि आपण त्याचा मनमोकळा आनंद उपभोगतोय का?  याचा मलाच नाही तर आपणा सर्वांना ही  2020 मध्ये   प्रत्यय आला असावा असे मला तरी वाटते.
क्षणात काय होईल याची खात्री नव्हती,आपल्या कडे किती पैसा, प्रॉपर्टी  आहे या पेक्षा आपले आयुष्य  किती आहे हा भीषण काळ कसा जाईल या विवंचनेत सारे जग होते.

आपण आपल्या दगदगीच्या  जीवनात स्वतः चे आयुष्य आणि कुटुंब याकडे फारसे महत्व दिले नाही कि कधी गरजेचं आहे याची खंत ही  जाणवली नाही,
कारण आपण आपल्या जीवनात कुटुंबातील ,सदस्य, मित्र मंडली, नातलग, यांचा आनंद, प्रेम, अनमोल वेळ, आरोग्य, याची कधी काळजी केली नव्हती. म्हणूनच  कि काय  "कोरोना " नामक  सैतानाने आपणास शहाणपणा, आयुष्याची किंमत काय असते ते विचार करण्यास भाग पाडले  असे म्हणावे लागेल.

आपल्या आयुष्यात किती पैसा कमवावा आणि त्यासाठी किती कष्ट आणि वेळ दयावा हे आपण ठरवावे लागते. अनेक लोक पैसा कमवण्यासाठी आपल्या आरोग्य, कुटुंब या कडे दुर्लक्ष करतात. पण जर समजा पैसा असूनही  आपली जिवाभावाची  माणसं आणि त्यानां देण्यासाठी असणारा वेळ तुमच्याकडे नसेल तर काय होईल.
हेच आपण शिकावे असे मला तरी वाटते. माणूस , माणुसकी आणि आपले कुटुंब महत्वाचे. कारण जगात सर्व  पैशाने विकत मिळेल पण  माणूस, माणसाचे अमूल्य प्रेम जिव्हाळा कुठल्याही बाजारात तुम्हाला करोडो रुपये देऊनही मिळणार नाही.
मी  या कोरोना काळात नक्की शिकलो आपल्या गरजा कमी आहेत, आणि त्याला कसे आणि किती ठेवाव्यात आपण ठरवलं तर बरे. विनाकारण आपण दर रविवारी  मोठ मोठया मॉल ला जातो आणि खर्च करतो. आपल्या पगारा पेक्षा आपला बढेजावं जास्त असतो. साधारण खर्चात घर चालवीता येऊ शकते, तरी एक घर, एक गाडी,कुटुंबा पुरते असताना सुद्धा आपण मोठे घर, गाडी या मोहात पडून खर्च वाढवतो आणि भयंकर कर्जाचा बोजा करून ठेवतो. त्यामुळे  आपण आणखीनच  पैसे कमवून परतफेड करण्याच्या नादात आपला अमूल्य वेळ वाया घालवितो.
आपण समजा एक गाडी, एक घर असेल तरी काही बिघडत नाही. आपण  सुखाने जगू शकतो आणि कुटुंब आणि नातलग यासोबत आनंदी आणि प्रेमाने जीवन सुखी,समृद्ध आणि  निरोगी करु शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे.

यापुढे मी आजपासून गरजे पुरते पैसे कमवून माझा स्वतः चा, कुटूंबाचा विचार करून, खूप आनंद  वाटणार , मुलांना वेळ देणार, आई वडील, नातलग याना सोबत घेऊन सहली काढणार.
आयुष्य म्हणजे आंनदी प्रवास आहे आणि त्या प्रवासात  आपण स्वतःही मनसोक्त आनंद घ्या आणि इतरांना ही द्या.
सद्गुरू श्री. वामनराव पै.यांचे वाक्य  कायम लक्षात राहील 

" जगा आणि जगू द्या ".


आपली स्वप्ने जी काही असतील ती पूर्ण करा. पण  आपल्या आरोग्य ची काळजी प्रथम प्रयोरीटी हे लक्षात असू द्या.
आपण जास्त दगदग न करता सुखाने, आनंदाने,
आपल्या सर्व जिवलगा सोबत प्रेमाने जगू या.
आणि म्हणू या.

जीवन गाणे गातच राहवे,
झाले गेले विसरून जावे,
पुढे पुढे चालावे,

 

लेखक : लव क्षीरसागर
मोबाईल : 9867700094

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू