पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिशा

                           दिशा 

 

            धनानंद नावाचा एक श्रीमंत उद्योगपती होता. दानशूर म्हणून तो प्रसिद्ध होता.

 

              एकदा एक माणूस त्याच्या दानशूरतेच्या कथा ऐकून त्याला भेटायला आला. विनम्रपणे धनानंद समोर उभा राहिला. माझ्या बहिणीला कोरोना झाला आहे. लाखांच बील झाल आहे. माझ्याजवळ पैसे नाहीत. कृपया मला मदत करा, विनवू लागला. धनानंदाला त्याची दया आली. दहा लाख रुपये त्याने त्या माणसाच्या हातावर ठेवले. लवकरच तुझी बहिण बरी होवो सांगून त्यास दिलासा दिला. 

 

              काही दिवसांनी त्या माणसाचा मित्र धनानंदाकडे आला. "तुम्ही ज्याच्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे दिले होते, त्या  माझ्या मित्राला बहिणच नाही. त्याने तुम्हाला फसवले आहे. "

 

           "फसवलं जाण" ही भावनाच किती त्रासदायक असते. मुर्ख बनवणे, फसवणे, खोट बोलणे हे सगळीकडे चालू असते. गंमत तर अशी आहे की,  लोक त्यातच स्वतःला शहाणे समजतात. 

 

           हे ऐकल्यावर धनानंद हसला व म्हणाला, " त्याने मला दहा लाखाला फसवले, ह्याचे मला दुःख नाही. देवाच्या कृपेने मला भरपूर पैसे मिळतील. पण त्याच्या घरी कुणी आजारी नव्हते हे ऐकून समाधान वाटले. "

 

          मित्र धनानंदाकडे आश्चर्याने पाहू लागला. धनानंद त्याला म्हणाला, "मला तुझ्या मित्राने फसवलं. हे 'फसवे स्वभाव' एक प्रकारचे कोरोनाच आहेत. माणसांना आतून लागलेला कोरोना. आता हा आतला कोरोना तुझ्या मित्राला कसा पोखरतो ते बघ. म्हणूनच मी स्वतःला आतून कोरोना संसर्ग होवू देत नाही. मन आणि शरीर सुदृढ ठेवतो."

 

             खरचं हा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे. बाहेरचा कोरोना तर आत्ता आला. आतला कोरोना तर पूर्वीपासूनच आहे. आतून माणसांना लागलेली ही किड थांबायला हवी.

    

तात्पर्य : दुसर्‍याला क्षणिक फसवणारा, स्वतःला मात्र चिरंतर फसवतो! 

 

                             धन्यवाद! 

 

सौ.मीना उल्हास करकरे. 

'दिशा' ही माझी स्वरचित लघु कथा आहे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू