पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ऑनलाईन कुटुंब

आज देशपांडे आजोबांचा पंचाहत्तरवा वाढदिवस.सगळया कुटुंबासाठी एकदम खास दिवस.आत्तापर्यन्तच्या आयुष्यात खूप काही त्यांनी सोसले होतं.खूप चढउतार पाहिले होते.एक एक पायरी चढत आयुष्यात सुखाची चव त्यांनी चाखली.मुलगा समीहन  बंगलोरला आणि धाकटी रेवा अमेरिकेला स्थायिक होती.आजोबांच्या वाढदिवासनिमित्त ते दोघेही आपापल्या कुटुंबासोंबत येणार होते.चार दिवस एकत्र धमाल करायची,एकत्र सेलिब्रेट करायच असं ठरलं होते.वाढदिवसच्या संध्याकाळी सगळ्या मित्र परिवार आणि नातेवाईकांसोबत एक छोटासा समारंभ करायचं ठरलं. सहा महिन्यांनी होणाऱ्या कार्यक्रमाचे सगळे प्लॅन्स तयार होते.

पण मार्च महिन्यात कोरोंना नावाचा राक्षस ह्या भूमीवर आला.त्याची चाहूल लागलीय अस म्हणता म्हणता त्यांनी विक्राळ रूप धारण केले.झपाट्याने पसरत त्याने संगळ्यानाचा जेरीला आणले.उपाययोजनेचा एक भाग म्हणून सगळीकडे टाळेबंदी जाहीर झाली.कुणालाही प्रवासाला बंदी होती.पंचाहत्तरीनिमित्त आखलेले सगळे मनोरथ धुळीला मिळाले.आपले घर पुनः चिवचिवणार ह्या आनंदात असणारे देशपांडे आजी आजोबा सर्वस्वी एकाकी झाले.नाही म्हणायला अजून हात पाय चालत असल्यामुळे हळूहळू घरातली काम सुरू होती.ऑनलाइन खरेदी पण थोडी थोडी करायला जमत होती.तसं सगळं काही ठीकच होतं पण तरीही खूप एकटं वाटत होतं. 

आज आजोबांचा वाढदिवस.सकाळपासून आजोबा थोडे उदास होते.आपल्या माणसांची खूप कमतरता भासत होती.टाळेबंदीमुळे गावातले मित्र,नातलग कुणीच भेटत नव्हते.WhatsApp वर सगळ्यांकडून शुभेच्छा होत्या.पण ह्या वयात आपल्या माणसांची ऊब हवीहवीशी वाटतेच ना.आजींनी खास आजोबाना आवडते म्हणून खीरपूरीचा बेत केला.आजीच्या आग्रहास्तव त्यावर ताव मारताना आजोबा नातवंडाना खूप मिस करत होते.संध्याकाळी आजीनी यूट्यूब वर बघून बिस्किटचा केक बनवला.लेकाचा  WhatsApp  वर मेसेज आला की ह्या गूगलमीट लिंक वर क्लिक कराल.आजोबांनी जॉइन केल्यावर सगळं घरकुल ऑनलाइन आलं होतं.मुलामुलीचे,नातवंडांचे हसरे चेहरे पाहून आजोबांचे डोळे पाणावले. “हॅप्पी बर्थडे  आजोबा” असा एकच जल्लोष संगळ्यांनी केला. आजी तेवढ्यात केक घेऊन आल्या.सगळ्यांसामोर आजोबांंनी कापला.आजीनी त्यांना ओवाळले.नातवानी बर्थडेसाठी खास गाणं वाजवले.नातीनी  त्यांंच्या आवडीचं गाणं गायले. रेवानी खास पत्र लिहिलं होतं. समीहन ने सगळ्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रांंना पण ऑनलाइन बोलावले होते. सगळयांंजवळ खूप काही बोलण्यासारख होते.खूप शुभेच्छा आणि आठवणीचा खजिना उघडला गेला.सगळ्यांंशी बोलता बोलता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही.लेकानी सगळ्यांंच्या मनोगतांंचा, शुभेच्छांचा एक विडियो बनवला होता.सगळ्यांच उदंड प्रेम पाहून दिवसभराचं उदासीच सावट पळून गेलं होतं.आपण ह्या जगात एकटे पडलेलो नाही, खूप प्रेम कमवलयं, माणसं कमवलीयत, सगळ्यांना हवेहवेसे आहोत ही भावना सुखावणारी होती.आज कृतार्थ वाटत होतं.खरंच आहे ना,माणसाला कितीही सुखसोयी उपलब्ध असल्या तरीही शेवटी त्याला माणसाच्या सोबतीची गरज असते. कुणीतरी आपलं दोन शब्द बोलणार हव असतं.कुणालातरी आपण हवे आहोत ही भावना जगण्याची उमेद देते. माणसाला माणूस हवाच कोंरोंनानी ही शिकवण नक्कीच दिलीय.भौगोलिक अंतर जरी नाही कापू शकलो तरी ह्या ऑनलाइनच्या निमित्ताने मनाची अंतरे निर्माण नाही होऊ दिली.सतत मोबाइल हातात म्हणून तरुण पिढीला नाके मुरडणारी जुनी पिढीही आता ऑनलाइन होऊ लागली आहे. त्याचा किती उपयोग करून घ्यायचा आणि कुठे थांबायचे हे आपणच ठरवणार.आत्ताच्या परिस्थितीत तर सगळंच कुटुंब ऑनलाइन झालंय आणि एकमेकांशी जोडलं गेलंय हे मात्र खरं!


अनघा जगदळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू