पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आलू लेलो कांदे लेलो

आलू ले लो-कान्दे ले लो

लॉकडाउन थोड़े-थोड़े उघडत चालले होते, आधीचे येणारे फेरी वाले, पुन्हा गल्लो-गल्ली आवाज देत निघत होते, त्यात भाजीवाले ठेले, सायकली वर दोन्ही कडे करीयर वर मोठाले टोपले लावून फळे विकणारे, केरसुणी ईत्यादी घरगुती सामान विकणारे येत होते. हे लोक तरी काय करणार? लाकडाऊन मधे या सर्व लोकांना तसीच पैश्यांची अड़चन, आणि विविध प्रकारचे सामान ठेवण्यासाठी पण घरात अड़चन म्हणून जेवढे जास्त सामान विकता येत आहे तेवढेच विकून पैसे तर कमवणे अति आवश्यकच ! या विषयी आमची चर्चा आटोपली आणि आम्ही परत आप-आपल्या रोजच्याच उद्योगात (आनलाइन) व्यस्त झालो. तेवढ्यात सौ, च्या (शेजारच्या) वहिनी आल्या, "काय झाले वहिनी तुमचा फोन आला म्हणून मी दार उघडले. बोला. काही काम होत ?" दोघींच्या तोंडावर मास्क अण गप्पा सुरु, “ नाही हो वहिनी काही काम न्हवते ,
मी म्हणत होते कि एवढे सगळे फेरीवाले येत आहेत पण तो जोरात ओरडणारा कांदे, बटाटे वाला अजुन आला नाही" वहिनी म्हणाल्या – “बरे झाले बाई नाही येत तो, काय जोरात ओरडायचा न तो, एकतर सकाळी 7 वाजले नाही की जो त्याचा ओरडा यायचा मग घरात सगळेच मलाच बोलायचे तू या माणसा कडे काही घेतेच कशाला उगाच आमची झोप मोडते, आता झोपतात हो 9 वाजे पर्यंत"

(रात्री चे नेटवर्किंग) थोड्या वेळ अजून गप्पा आणिक चालणार, तेवढ्यात छोटू आला आणि आई मला दूध दे - मग झाल दारा वरच्या गप्पानां विश्राम ..असेच रोजच या शेजारीण, दारावरच्या गप्पा करत असायच्या.

एक दिवस सौ, नी फरमान सोडले की निगमच्या गाडी वर येणारे कांदे बटाटे किती खराब निघत आहेत शिवाय महाग ही देत आहे त्या शेजारच्या वहीनीनां भाऊजींनी बाजूच्या गल्ली तून कुठून तरी कांदे- बटाटे आणून दिले, ते स्वस्त आणि चांगले ही आहेत हे बघा ! (काय हा पण जाहिराती चा प्रकार) तुम्हाला पण हवे तर तुम्ही पण घेऊन या.  माझे ऑनलाइन काम संपले त्या नंतर शेजारी संजय शी फ़ोन वर बोलून विचारले कि - कांदे -बटाटे कुठे अणि काय भावा नी मिळणार. तो म्हणाला आपल्या मागच्या गल्लीत बस्ती मधे मिळतात आणि किंमत ४० रुपये किलो आहे. आणि खाली रहाण्यारा शर्मा यांना पण विचारुन घे! आम्ही तिघे ही कापडी पिशवी, सुट्टे पैसे, मास्क लाऊन शेजारच्या गल्लीत पोहचलो .

तिथे लहान मुले आपल्या आगंणात खेळत होते त्यांंनाच संजयनी विचारले, " बच्चो हमें आलू और कान्दे चाहिए. मिलेंगे?" मुल लगेच पुढे आले - "कितने चाहिए 2-2 किलो ही मिलेंगे ।" आम्ही तिघांनी लगेच आमच्या पिशव्या पुढे केल्या पैसे मुलांनी घेतले नाही आणि ते समोर पळत निघुन गेले अर्धा तासानंतर ते एका मोठ्या मुलीबरोबरआमच्या पिशव्या घेऊन आले ती ने 160/- प्रत्येका कडून मागुन घेतले, तिन्ही पिशव्या आमच्या कडे दिल्या, आम्ही लगेच घरा कडे परत निघालो आता जास्त वेळ बाहेर रहाण्यया नी घाबरायला होतं (कोरोना) म्हणून घरी आल्यावर अगदी मौल्यवान वस्तू घरात आली अस सौ, च्या चेहर्याावर हास्य आहे असं मला जाणवलं त्या नन्तर पन्धरा दिवसा नी पुन्हा आम्ही तिघे परत त्या गल्लीत गेलो, तिच मुले स्वता च, पुढे येऊन म्हणाले "आज आखरी आधी बोरी बची है अब खतम हो गये" आणि आमच्या पिशव्या घेऊन तो गेला, थोड्याच वेळेत आला आणि पैसे घेउन पिशव्या आमच्या पुढे केल्या. काही दिवसातच बाजारात हळू हळू सर्व सामान खरेदी साठी सुलभ होऊ लागले आता तर आमचे आफिस वगरे सुद्धा आम्हाला मधुनच कधी तरी कामा निमित्त बोलवून घेत होते सकाळचे मार्निगवाक ही सुरु झाले आणि आपसात अन्तर राखून संवाद ही करणे चालू झाले होते, तेव्हाच कळले की कालोनीतले किती जण कोरोना नी गेले. त्याच माहिती वरुन सौ, शेजारच्या वहिनींंनां सांगत होती की तो जोरात आवाज लाउन कांदे बटाटे विकणारा पण कोरोना नीच गेला हो, असे ही कळले की त्याने लाकडाउनच्या आगोदरच 5 - 5 बोरी कांदेबटाटे भरुन ठेवले होते अण आठच दिवसात गेला पण हो।

वहिनी म्हणाल्या अहो मला तर कळले की तो एकटाच रहात होता बस्ती मधे, पण तिथल्या लहान मुलांशी खूप प्रेमा नी वागायचा, त्यांच्या आवश्यक गरजा पण सांभाळत होता म्हणे, ते मुल सुद्धा त्याच्या कडे खुप लक्ष देत होते. अशाच आणिक काही गप्पा सुरु असतील, पण माझ्या डोक्यात मात्र मी आणलेले ते कांदे बटाटे, आणि त्या वेळेस जो आनंद सौ ला व वहीनीं झाला ते आठवले, अणी मी निशब्द झालो पुजे ची तैयारी करून ठेवली होती, पुजेला बसलो पण पुजेत लक्ष लागत नव्हतं, मग मी स्तौत्र म्हणत होतो, नाम स्मरण जप सुरू केले पण हे सर्व काही मला ऐकूच येत न्हवत, माझ्या कानात तर त्या फेरी वाल्या चा, च आवाज ऐकू आल्या सारखे वाटत होते "आलू ले लो कान्दे ले लो!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू