पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मन

मन


मन हे किती सारखं बोलतच रहातं अन् सुचवतच राहत,
पण कधी ते पुर्ण होतं ?
काय करु शकते ,काय नाही,
हे पण तुच ठरवतोस न!
आत्ता इथे तर लगेच तिथे,
अगदी इथेच नाही
तर बाहेर दूर सुद्धा,
कधी आगदी शांत तर कधी बिथरलेले..
काय करु ,काय नाही, हे सुद्धा मनाचे न!
मग अरे माझं काय ?
हसावे की रडावे,
आठवावे की विसरून जावे ? जायला निघावे तर परत मागे, अरे काय हे!
काहीच करता का येत नाही?
अन् हट्ट धरला तर ,
त्याचेही श्रेय तुलाच न!
तुला झटकून काहीच कसं करता येत नाही?
बरं हे बाजुला ठेवले तर
माझ्या भावनांना शब्दच नाही! बळजबरीने शब्द टाकले तर
"मना" तुला ते पटतच नाही , तुझी तर चंगळच आहे।
तुझीच तर ही, सगळी खेळी रे "मना" सांग तर!
तसे,ठिकाण आहे तरी कीती, तुझे! काय सांगतोस?
माझ्या जवळच??
नाही रे, मला नाही वाटत
अजुन तर मीच मला स्वतःलाच शोधत आहे....
त्यात तुझी कुठे साथ?
तू तर मला भरकवटच जातो
आणि मलाही भटकंती करवतो ।।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू