पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

असं का?

असं का?
पहिली नजर पडताच
मनाला भुलवतं कुणीतरी?
हृदयात जाऊन बसतं
स्वतःला हरवून बसतं कोणीतरी?

असं का?
आपलंच मन वेड होतं
सुख स्वप्नांना रंगवत बसतं
आजूबाजूच्या विश्वाला विसरून
स्वतःच्या विश्वात रममाण होत

असं का?
उगाच हृदयाला हुरहुर लागते 
दिवस अन् रात्र कळत नाही
तीच नजरेसमोर मंद मंद हसत येते
हा नुसताच नजरेचा भास की
वेड्या मनाचा वेडा भ्रम कळत नाही

असं का?
सर्वकाही विश्वासानं जुळूनही
आपल्याच वाटा वेगळा होतात
नजरचं नजरेला फसवते
ह्दयचं हृदयाला धोका देते

असं का?
नुसता प्रश्नच अन प्रश्न
अन् समोर अंधार... अंधार...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू