पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महानायक

"शुरा मी वंदिले "आशाताईंचे हे देश भक्ती गीत अगदी सार्थ आहें आपल्या देशाचे शूरवीर खरोखरच वंदनीय आहेत

सैन्याचे हे शूरवीर धरतीपुत्र आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची तमा न बाळगता मरणनोमुख उभे असतात मग तें राजस्थानच्या जेसळमेर
चे मारुस्थळ असो जेथे दुरवर पाण्याचा एक थेंब ही आढळत नाही 50 डिग्री तापमानात डोक्यावर सूर्य नुसता आग ओकत असतो अथवा सदैव बर्फच्छित असलेले लडाख क्षेत्र!!
लड्डाख क्षेत्रात आपल्या सैनिकांना शत्रूच्या सामन्या बरोबरच एक अजून शत्रूचा सामना करावा लागतो व तो म्हणजे तेथील भोगोलिक स्थिती व विपरीत हवामान!!
थंडीत ह्या क्षेत्राचे किमान तापमान -50डिग्री पर्यन्त घसरते!
युद्ध क्षेत्र सियाचिन बॉर्डर 20,000फीट उंचीवर, व अति उंचि मुळे अपुरा ऑक्सिजन पुरवठा व सतत हिमपात!त्यामुळे आपल्या सैनिकांना अनेक अति उंचि आजाराना
सामोरे जावे लागते.
1... फुफुसावर सूज येणे (pulmonary oedema )
2फुफुसात पाणी एकत्रित होणे, नाकातून रक्त येणे.
3..डोक्यात सूज येणे, चक्कर येणे वांत्या होणे. कधी कधी तर सैनिक झटके येऊन बेशुद्ध देखील होतात.
अनेकदा माइनस तापमान झाल्याने शरीराच्या उघड्या भागाची, (हात, पाय, नाक इत्यादी ) वसा अति थंडीने गोठरते त्यामुळे संबंधित भागाचा रक्त पुरवठा बंद होतो व त्यामुळे शरीराचा तो भाग निकामी होतो ( frost bite ). अनेकदा शरीराचा तो हिस्सा सर्जरी करून काढावा लागतो.
त्याचं प्रमाणे अति जखमी झालेल्या रुग्णाला वा गंभीर स्थिती असलेल्या रुग्णाला मोठ्या रुग्णालयात हलवणे आवश्यक असते व त्या क्षेत्रातील मोठे सुसज्ज
सैन्य रुग्णालय लेह येथे होय! लेह पासून सियाचिन बॉर्डर
चे अंतर 180किलोमीटर!!
खूप जास्त अंतर व विपरीत हवामान ह्यामुळे वाटेत रुग्ण
दगावण्याची देखील शक्यता असतें
आणि... सैनिकांची हीच व्यथा ओळखली कोल्हापूरच्या श्रीयुत प्रतापराव जाधवांनी!!
श्रीयुत प्रतापराव जाधव हे कोल्हापूर निवासी, पुढारी पत्रिकेचे संपादक!!
कारगिल युद्धानंतर ह्या क्षेत्रात त्यांना एक रुग्णालयाची
आवश्यकता जाणवली.
त्यांनी पुढारी पत्रिकेतून जनतेला आव्हान करून जनते कडून एक कोटी रकम एकत्रित केली व जवळ, जवळ दोन कोटी रकम स्वतः दान केली.
स्वतः तत्कालीन रक्षा मंत्रीची भेट घेऊन त्यांना स्वतःचे मनोगत सांगितले.
रक्षमंत्रालयाने पूर्ण तपशील घेऊन हुंदूर ह्या गावात सैनिक रुग्णालय उभे करण्यासाठी जमीन स्वीकृत केली.
सहा महिने स्वतः हजर राहून स्वतःच्या देखरेखीत वीस बिस्तरीय रुग्णालयाचा हा प्रकल्प उभारला.
मेडिसिन, सर्जरी, व जनरल वॉर्ड असे हे वीस बिस्तरीय रुग्णालय आज सुसंज्जीत आहें.
अत्त्यानुधिक संगणाकाच्या साहाय्याने येथील रुग्णसेवा देशातील सात मोठ्या लष्करी रुग्णालयाशी जोडलेली
आहेत.
अति उंचीच्या सर्व आजारांच्या निदानाचे व उपचाराचे साधन उपलब्ध आहेत. चोवीस तास डॉक्टर, नर्सेस परा
मेडिकल स्टाफ उपलब्ध असतात.
सैनिकांना आता उठसुठ अन्य रुग्णालयात धाव घ्यावी लागत नाही.
गेल्या अठरा वर्षात ह्या रुग्णालयात एकही रुग्ण दगावलेला नाही
देशाचे संरक्षण करणारे आपले सैनिक खूप मोठे देश भक्त आहेतच पण देशाचे रक्षण करणाऱ्यांचे रक्षण करणारे देखील मोठे देशभक्तच!!
अश्या या महा नायकला माझे कोटी.. कोटी.. नमन !! 

डॉ विद्या वेल्हाणकर
अंधेरी, मुंबई.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू