पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेम

प्रेम

माणसानं फक्त प्रेम कराव
प्रेम करत जगावं
प्रेम करतच मरावं

प्रेम चोवीसकरेट सोनं असतं
त्यात मिसळ काहीच नसतं
तावून सुलाखून काढलं तरी
ते जसच्या तसच असतं.

प्रेमांत नसते वासना
प्रेमांत नसतो द्वेशराग
प्रेमांत रिमझिम श्रावण असतो
विझवत राहतो मनाची आग
पशु- पक्षी झाडं फुलं नदि- सागर
सार्या सु्ष्टीवर प्रेम केलं तरमिळतो स्वर्गीय आनंद
म्हणून सर्वान् वर प्रेम
करायचा
लावावा मनाला छंद.

माणसानं माणसान् वरही प्रेम करावं
स्त्री -पुरूष धर्म-जात
काळं गोरं ह्या निरर्थक
गोष्टींचं प्रेमांत बंधंन नसावं.
प्रेम कितीही केलं, कितीही दिलं,तरी नको कुणी म्हणत नाही,
प्रेमांच्या वर्षावांत कुणी
कधी दुक्खानं कण्हतं नाही.
प्रेमांत असतो त्याग,
व्यवहाराचं गणित नसतं,
जिथं मांडलं जात गणित, ते खरं प्रेम नसतं.
प्रेम स्पर्शानं करता येतं,
प्रेम नजरेनं करता येतं,
कधी प्रेमाला शब्दांची गरज असते ,तर कधी
मूकपणे ही करता येते.

प्रेम म्हणजे सुगंधित फुलें
त्यांना प्रेमाचाच सुगंध असतो ,
प्रेम सर्वस्वाचं दान असतं ,तसं करता आलं नाही ,तर ते वेडं आकर्षण असतं.
सोनं चांदी अन्न-धान्य
कोणी कोणी दान करतात,पुण्य पदरांत पडावं काही मनांत अशी अपेक्षा धरतांत,
पण प्रेम करणार्याला
आपोआपच प्रेम मिळतं
प्रेमाचा एक दाणा टाकला की त्याचं भरगच्च कणिस होतं
त्याचं भरगच्च कणिस होतं

माधवी करमळकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू